शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेस गुण साठी आपले सरकार पोर्टलवर आता विद्यार्थ्यांना करावा लागणार ऑनलाइन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:05 IST

Bhandara : आपले सरकार पोर्टलवर करावा लागणार अर्ज : ऑनलाइन अर्ज केला का?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : क्रीडा स्पर्धेत यश मिळविले असल्यास इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा ग्रेस गुण दिले जातात. यासाठी पूर्वी ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात होते. आता क्रीडा ग्रेस गुण प्राप्त करण्यासाठी आपले सरकार सेवा पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

प्रत्येक वर्षी दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफलाइन अर्ज मागविले जातात. त्या माहितीचे संकलन करून क्रीडा कार्यालयाद्वारे सदरचे अर्ज माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळास क्रीडा ग्रेस गुण मिळण्याकरिता पाठविले जातात.

सन २०२३-२४ पर्यंतची ग्रेस गुण प्रक्रिया काही मानवी उणिवांमुळे क्लिष्ट होत होती. सवलत गुण प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी २०२४-२५ पासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रेस गुण घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

अंतिम तारीख काय?क्रीडा ग्रेस गुण मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासंदर्भातील अंतिम तारीख काय आहे, याची माहिती आपले सरकार पोर्टलवर सध्या तरी दिसून येत नाही.

कोणत्या खेळांसाठी हे गुण लागू?जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा प्रावीण्यासाठी सवलत गुणांसाठी केवळ ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. वैयक्तीक व सांघिक खेळांचा समावेश आहे.

ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाहीकोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालयास अथवा शिक्षण मंडळास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणार नाही व अशा प्रकारच्या ऑफलाइन अर्ज कोणत्याही जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्वीकारला जाऊ नये, अशी बाब मुख्यालयाच्या निदर्शनास आली तर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित जिल्हा क्रीडाधिकारी जबाबदार राहतील.

कोणती कागदपत्रे ?दहावी, बारावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्यासंदर्भात हॉल तिकीट, क्रीडा प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

संस्थांची जबाबदारी काय?सर्व शाळा व महाविद्यालय प्रमुखांनी पात्र विद्यार्थ्यांना या सूचनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, एकही पात्र विद्यार्थी वंचित राहणार नये, याची जबाबदारी संस्थेवर राहणार आहे. सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज कसा करणार?खेळाडू विद्यार्थी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांना आपले सरकार अॅपद्वारे या वर्षीपासून क्रीडा ग्रेस सवलत गुणांचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा