शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी पाडली पात, शेतकऱ्यांनी दिली कौतुकाची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:45 IST

भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र आधुनिक शिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांचे शेतीशी असलेले नाते तुटत चालले आहे. शेतीत कुणी काम करायला नाही. विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी लाखनी तालुक्यातील मिरेगाव शाळेने अभिनव उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी भर पावसात शालेय कविता म्हणत अर्धा तास रोवणी केली. विद्यार्थ्यांनी पाडली पात, अन् शेतकऱ्यांनी दिली कौतुकाची थाप.

ठळक मुद्देमिरेगाव शाळेचा उपक्रम : भरपावसात विद्यार्थ्यांनी कविता म्हणत केली रोवणी

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र आधुनिक शिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांचे शेतीशी असलेले नाते तुटत चालले आहे. शेतीत कुणी काम करायला नाही. विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी लाखनी तालुक्यातील मिरेगाव शाळेने अभिनव उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी भर पावसात शालेय कविता म्हणत अर्धा तास रोवणी केली. विद्यार्थ्यांनी पाडली पात, अन् शेतकऱ्यांनी दिली कौतुकाची थाप.शिक्षकांनी मनावर घेतले तर कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकतो. लाखनी तालुक्यातील मिरेगाव ही शाळा उपक्रमशिल शाळा म्हणून नावारुपास आली आहे. सर्जनशील आणि कल्पक शिक्षक येथे नानाविध उपक्रम राबवित आहेत. सध्या जिल्ह्यात भात रोवणीचा हंगाम सुरु आहे. विद्यार्थ्यांचे कृषीशी नाते घट्ट व्हावे यासाठी शाळेने रोवणीचा उपक्रम राबविण्याचा निश्चय केला. शाळेचे मुख्याध्यापक डमदेव कहालकर यांनी आपल्या शिक्षकांना या उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. भर पावसात विद्यार्थी उत्साहाने शेतात पोहचले. रोवण्याचे प्रात्याक्षीक शिक्षण देवून पाठ गिरविणे सुरु झाले. विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने गुडघाभर पाण्यात उभे राहून रोवणीचे काम केले. आपली मुले रोवणीच्य कामात तरबेज होत असल्याचे पाहून पालकही आनंदीत झाले. विद्यार्थ्यांचा पाठीवर कौतुकाची थाप दिली. शेतकरी, गावकरी आणि शाळा यांच्यातील दुरावा कमी झाला. मुख्याध्यापक डमदेव कहालकर म्हणाले, विद्यार्थ्यांचे शेतीशी असलेले नाते घट्ट करण्यासोबतच त्यांना निसर्गाचे सानिध्य मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. निसर्गाेपचारामध्ये प्रकृती स्वास्थ्यासाठी मातीत गाठून घेतात. चिखलात पाय अधिक वेळ ठेवल्याने शरीरातील घातक द्रव्य माती शोषून घेते. या उपक्रमासाठी शिक्षक सहदेवकर, नाना कठाणे, चंद्रशेखर कापगते, पालिकांचद बिसने, यशवंत गायधने, केशव वडेकर आदीनी सहकार्य केले.