शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:14 IST

मनुष्यस्वभाव सतत शिकण्याचा आहे. अखेरच्या श्वासापर्यंत शिक्षण आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्ती करीता परिश्रम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पशुसंवधृन सहायक संचालक डॉ. कृपाचार्य बोरकर यांनी केले.

ठळक मुद्देकृपाचार्य बोरकर : जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मनुष्यस्वभाव सतत शिकण्याचा आहे. अखेरच्या श्वासापर्यंत शिक्षण आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्ती करीता परिश्रम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पशुसंवधृन सहायक संचालक डॉ. कृपाचार्य बोरकर यांनी केले.जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या तीन दिवसीय स्रेहसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य मिताराम खोब्रागडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त उपप्राचार्य जी.जे. चव्हाण, सेवानिवृत्त प्रा. वसंत सार्वे, भास्कर बडवाईक, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सार्वे उपस्थित होते.स्रेहसंमेलन स्रेह, आपूलकी तथा आनंद मेळावा असून विद्यार्थी सुप्तगुणांचे प्रदर्शन करतात. विद्यार्थी जीवन आनंद व परिश्रम याचा मेळ आहे, असे प्राचार्य मिताराम खोब्रागडे यांनी सांगितले. प्रा. वसंत सार्वे यांनी विद्यार्थ्यांनी आपले उद्दिष्ट साध्य करावे असे सांगितले. सेवानिवृत्त उपप्राचार्य चव्हाण यांनी विद्यार्थी जीवनात अभ्यासात सातत्य ठेवित तोच यशस्वी होईल, असे सांगितले. उद्योजक दिलीप सार्वे यांनी शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून व्यक्तीमत्व घडविणारे प्रशिक्षण आहे, असा उपदेश दिला.सर्वप्रथम सरस्वती तथा संस्थेचे संस्थापक स्व. श्यामसुंदर बोरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उमवली सोनेरी आज पहाट या स्वागत गीताने सर्वांचे मत मोहून घेतले. तीन दिवसीय स्रेहसंमेलनात रांगोळी स्पर्धा, पुष्परचना, चित्रकला, समूहनृत्य, बौद्धिक स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. संचालन प्रा. एन.टी. कापगते, प्रा. आशिष खोब्रागडे, अतिथींचा परिचय प्रा. मोहन भोयर, प्रास्ताविक व आभार प्रा. विद्यानंद भगत यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. शशिकला पटले, प्रा. नितीन पाटील, प्रा. गणेश चाचीरे, प्रा. सविता बोरकर, धमेंद्र कोचेसह विद्यार्थी, विद्यार्थीनीनी सहकार्य केले.