शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त अंगी बाणावी

By admin | Updated: January 12, 2016 00:43 IST

आपल्या देशात रोज ४००-५०० लोकांचा मृत्यू हा रस्ता अपघाताने होतो. कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांपेक्षा ही संख्या मोठी आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटनभंडारा : आपल्या देशात रोज ४००-५०० लोकांचा मृत्यू हा रस्ता अपघाताने होतो. कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांपेक्षा ही संख्या मोठी आहे. याचे मुख्य कारण मानवी चूक हेच आहे. देशात स्वयंशिस्तीचा अभाव आहे. युवकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त अंगी बाणावी तर आपण रस्त्यावर होणारे अपघात कमी करू शकतो. रस्त्यावर रक्त सांडण्यापेक्षा देशासाठी रक्त सांडा, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.२७ वा रस्ता सुरक्षा सप्ताह १० ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा उद्घाटन कार्यक्रम पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, सर्वात उत्तम ब्रेक हा मनाचा आहे. पालकांच्या वागण्यातूनच मुलांवर संस्कार होत असतात. मात्र आपल्यावर पिढ्यानपिढ्यांपासून केवळ बेशिस्तीचा संस्कार होत आहे. जोपर्यंत आपण स्वत:ला शिस्त लावणार नाही तोपर्यंत आपण महासत्ता होवू शकणार नाही. शाळेत, महाविद्यालयात आणि घरी मस्ती करा, मात्र रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळा आणि सुरक्षित राहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.पोलीस अधीक्षक विनिता साहू म्हणाल्या, मुलांच्या शालेय बसेस आणि आॅटोरिक्षा सुरक्षा नियमांचे पालन करतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी पालकांची सुद्धा आहे. आॅटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बसविले तर अपघाताची शक्यता जास्त असते. त्यामुळे रस्ता सुरक्षा नियम सर्वांनीच पाळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.दीप प्रज्वलनाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी अपघात कसे होतात याबद्दल चित्रफिती दाखविण्यात आल्यात. रस्ता सुरक्षेसंदर्भात मोटार वाहन निरीक्षक चिंचोळकर यांनी तयार केलेल्या काऊंट डाऊन या चित्रफितीचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले. संचालन आरती देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंदुलकर यांनी केले.या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर अडे, उपशिक्षणाधिकारी आयलवार, पोलीस अधिाकरी, वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)