शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ग्रामीण भागातील विद्यार्थिनी विद्यापीठात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

मुन्नी गोपाल कावळे असे गुणवंत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती पाहुणगाव येथील रहिवाशी आहे. वडील गोपाल कावळे अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्यावरच उपजिवीका आहे. तीची आईही शेतात राबते. मात्र या कुटुंबात शिक्षणाला महत्व दिले जाते. आई-वडील मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देतात. मुन्नी हिच्या प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत घरच्यांनी सहकार्य केले.

ठळक मुद्देसंडे अँकर । पाहुणगावची गुणवंत विद्यार्थिनी, समाजकार्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : ग्रामीण प्रतिभेला योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले तर काय होऊ शकते याचे जीवंत उदाहरण लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथे बघावयास मिळते. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या एका विद्यार्थिनीने गोंडवाना विद्यापीठातून समाजकार्य पदव्युत्तर पदवी गुणवत्तेसह प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींपुढे तिने आदर्श निर्माण केला.मुन्नी गोपाल कावळे असे गुणवंत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती पाहुणगाव येथील रहिवाशी आहे. वडील गोपाल कावळे अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्यावरच उपजिवीका आहे. तीची आईही शेतात राबते. मात्र या कुटुंबात शिक्षणाला महत्व दिले जाते. आई-वडील मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देतात. मुन्नी हिच्या प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत घरच्यांनी सहकार्य केले. खरे पाहता मुन्नीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी घेतले. शाळेत जाताना ती दररोज सायकलने जायची.शालेय शिक्षणापासूनच तिला समाजसेवेची आवड होती. याच क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय केला. त्यामुळे तिने बारावीनंतर बीएसडब्लू अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. गडचिरोली येथे जाऊन तिने बीएसडब्लू पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तीने त्याच महाविद्यालयात प्रवेश घेतला. नुकत्याच लागलेल्या निकालात मुन्नी कावळे गोंडवाणा विद्यापीठातून प्रथम मेरिट आली. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवत मुन्नीने तालुक्याच्या शिरात मानाचा तुरा खोवला. तिचे तालुक्यात कौतुक केले जात आहे.ग्रामीण प्रतीभामुन्नी कावळे या विद्यार्थिनीने ग्रामीण प्रतीभा सिद्ध करून दाखविली. विविध अडचणींचा सामना करीत तिने उच्च शिक्षण घेतले. प्रत्येक परीक्षेत ती गुणवत्ता यादीत चमकत गेली. समाजकार्य विषयाची पदव्युत्तर पदवी तिने विद्यापिठातून प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. आता तिला ग्रामीण भागातील समस्यांवर अभ्यास करावयाचा आहे. तिने जे ग्रामीण भागात अनुभवले त्या समस्या तिला उजागर करून सोडविण्यासाठी प्रयत्न करावयाचा आहे. ग्रामीण महिलांच्या समस्यांवरही तिला काम करावयाचे आहे. ग्रामीण भागातून आलेली ही विद्यार्थिनी समाजकार्य विषयातून आता आपल्या गावालाच नव्हे तर परिसराला विकसित करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठStudentविद्यार्थी