प्रशांत देसाई भंडाराराज्य शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहेत. तर दुसरीकडे शैक्षणिक प्रगतीच्या साहित्यनिर्मितीचे अनुदान मागील तीन वर्षांपासून बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची प्रगती खुंटली आहे.समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तींपर्यंत शासकीय योजना पोहचल्या पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शिक्षण विभागाने शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिम हाती घेवून विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले आहे. एकीकडे, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मिळणाऱ्या दर्जेदार शिक्षणामुळे मराठी शाळा त्यातल्या त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांतील विद्यार्थी संख्या दरवर्षी कमी होत चालली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या टिकवून ठेवावी यासाठी, राज्याच्या शिक्षण विभागाने नानाविध योजनांची अंमलबजावणी केली असताना दुसरीकडे शाळांमधील जुन्या योजना बंद करण्यात येत असल्याचे प्रकार समोर आला आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगरपरिषदच्या ८२४ शाळा सुरू आहेत. येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सुधारणा व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेतील शिक्षकांना शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी प्रती शिक्षक ५०० रूपये अनुदान दिले जात होते. यातून शिक्षक कच्चे साहित्य खरेदी करून शाळेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती करून त्यातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. यातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होण्यास मदत झाली. मात्र, राज्य शिक्षक विभागाने शैक्षणिक साहित्य निर्मितीचे अनूदान मागील तीन वर्षांपासून बंद केले आहे. अनुदान बंद केल्यामुळे शिक्षक आर्थिक अडचणीत सापडल्याने साहित्य निर्मितीवर परिणाम पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खुंटल्याची स्थिती निर्माण झाली आहे.अनुदानासाठी दरवर्षी प्रस्ताव सादर करण्यात येतो. मात्र, तीन वर्षापूर्वी बंद केलेले अनुदान पूर्ववत सुरू झाले नाही. यावर्षी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू झाल्याने पुन्हा जिल्ह्यातील ४,८६४ शिक्षकांना प्रती शिक्षक ५०० रूपये २४ लाख ३२ हजारांचे अनुदान मिळावे, असा प्रस्ताव राज्य शिक्षण विभागाकडे सादर केला आहे.- वीरेंद्र गौतम, सहायक कार्यक्रम अधिकारी, सर्व शिक्षा अभियान, भंडारा.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हा कृतीयुक्त साहित्यातून शिकतो. राज्याच्या शिक्षण विभागाचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होत आहे. ५०० रूपयातून साहित्य निर्मितीचा खर्च भागत नाही तर शिक्षकाला यापेक्षा जास्त खर्च सोसावा लागतो. त्यामुळे शिक्षण विभागाने यात वाढ करावी व अनुदान शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीला द्यावे.- मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र रा.प्रा. शि.सं. भंडारा. पाठ्यघटकाच्या आकलनासाठीशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षणात अडचण येवू नये यासाठी शैक्षणिक साहित्यनिर्मिती करण्यात येते. यात शाळेतील विद्यार्थ्यांना विषयानुसार पाठ्यघटक सहजभाषेत व लवकर आकलन होण्यासाठी हे साहित्य बनविणे व त्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे. साहित्यनिर्मितीतून इंग्रजी अक्षराची सोप्या भाषेत ओळख होते.चित्र व अक्षरावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपाठ्यपुस्तकात डोंगराची माहिती असल्यास त्याचे चित्र काढून त्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. सोबतच अक्षर कॉर्ड तयार करणे ज्यात काना, मात्रा हे अक्षर निर्मिती करणे करून त्याचे वाचन व लेखन करणे. या कार्यानुभवातून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून शिकविले जाते. यासाठी रंगित कागद, स्केचपेन, मणी आदी साहित्याचा वापर करण्यात येते.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता खुंटली!
By admin | Updated: March 13, 2016 00:26 IST