नाना पटोले यांचे प्रतिपादन : आसगाव येथे रौप्य महोत्सवपवनी : प्रगत वैज्ञानिक युगात शैक्षणिक माध्यमात होणारे नवनविन प्रयोग पाहता शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थी मागे पडत आहेत. प्रत्येक पालकांची इच्छा असते की, आपला पाल्य शिक्षणात अव्वल येवून नावलौकिक करेल ; मात्र पालकांसमोर बरेच कठीण प्रसंगांमुळे ते पाल्यांना व्यवसायीक शिक्षण देण्यात अकार्यक्षम ठरतात. त्यामुळे ग्रामीण भागातील शाखांमध्ये व्यावसायिक शिक्षण मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.आसगाव (चौ.) येथील राजुबाई कन्या विद्यालयाच्या रौप्य महोत्सवाप्रसंगी खासदार पटोले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुर्ती उद्योग समुहाचे संचालन अनिल मेंढे तर प्रमुख अतिथी म्हणून पवनी पं.स. सभापती अर्चना वैद्य, जि.प. सदस्या चित्रा सावरबांधे, पं.स. सदस्य मंगेश ब्राह्मणकर, संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत भेंडारकर, सचिव रमेश पुऱ्हे, उपाध्यक्ष माधवराव डोये, शाळा व्यवस्थापन समितीचे मुरलीधर कोरे, वनिता वैरागडे, ग्रा.पं. सदस्य कांता सावरबांधे, विवेक मेंढे आदीची यावेळी उपस्थिती होती.खासदार पटोले म्हणाले शैक्षणिक व्यवस्थेत बदल आणण्याच्या दृष्टीने केंद्र शासन पुढील आर्थिक बजेटमध्ये व्यवसायीक शिक्षण खास करुन ग्रामीण भागामधील शाळांमध्ये कसे दिले जाणार यावर एकमत झाले आहे. यासाठी ज्या संस्था सुदृढ आहेत. त्यांनी स्वत:हून व्यवसायीक शिक्षण विद्यार्थ्यांना प्राप्त करुन देणे आवश्यक आहे. स्रेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे योग्य मंच असून प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या अंगी असलेल्या कलेला न्याय देऊन प्रदर्शित करणे महत्वाचे आहे. स्पर्धेच्या युगात व्यावसायिक शिक्षण महत्वाचे असून शिक्षण क्षेत्रात व्यापारीकरण करु नये असा मोलाचा सल्लाही खासदार नाना पटोले यांनी संस्थाचालकांना दिला.रौज्य महोत्सवाप्रसंगी स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या हस्तलिखित पुस्तकांचे विमोचन व विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून मेंढे म्हणाले की ओबीसी विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात मागे पडत असून ओबीसीसाठी आपला लढा आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. संस्थाध्यक्ष विष्णुपंत भेंडारकर यांच्या भरारी या कविता संग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच खास मुलींसाठी कन्या विद्यालय सुरु करुन २५ वर्षे पूर्ण केलेल्या त्रिमूर्तीचे खासदार नाना पटोले यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पुढील वर्षीपासून मुलीचेच सिनिअर कॉलेज सुरु करावे, जेणेकरुन सावित्रीबाई फुलेचा आदर्श ही शाळा जोपासत असल्याचे सांगितले.पाहुण्यांचे स्वागत भारत मातेच्या गीतावर आधारित लेझीम नृत्याने केले. यावेळी माझी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर १० वी व १२ वी च्या परीक्षेत प्रावीण्यप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र तसेच रोख बक्षीस देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या रेखाताई भेंडारकर यांनी केले तर संचालन सहायक शिक्षक मनोहर महावाडे यांनी तर आभार रमेश गभने यांनी मानले.कार्यक्रमासाठी के.डी. शिवणकर, बी. एन. शेंदे, सुधाकर आकरे, अमर भेंडारकर, हिरालाल देशमुख, एस. के. सावरबांधे, मेघा मेंढे, कु. एम. आर. चुऱ्हे, उमेश रहेले, एच. एस. रहेले, कावळे, सुभांगीनी लेदे, निशा तरोणे आदी सहकार्य करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची गरज
By admin | Updated: January 13, 2016 00:37 IST