करडी(पालोरा) : माेहाडी तालुक्यातील पालोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतावर कृषी व्यवस्थापनाचे धडे गिरवत २१ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केली. कृषी शिक्षक व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रब्बी पिकांच्या लागवडीसाठी मशागत, सरी तयार करणे, बियाणे लागवड, खत, पाणी व कीटकनाशकांचे व्यवस्थापन तसेच कापणी व मळणीपर्यंतच्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष कामातून माहिती घेतली.
पालोरा शाळेचे कृषी विषयक शिक्षक वैभव पालांदूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालोरा येथील रवींद्र कुकडे, प्रदीप कुकडे, केसलवाडा येथील प्रकाश साठवणे व जाभोरा येथील रामेश्वर नेवारे यांच्या शेताची निवड करण्यात आली होती. बारावीच्या विद्यार्थ्यांनी पाच गट तयार करून कृषी विषयक व्यवस्थापन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष कृती करवून दाखविली. विद्यार्थ्यांनी प्रत्येक दिवशी शिक्षक व शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडे गिरविले.
कोट
विद्यार्थ्यांनी नवनिर्माणाचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले ज्ञान व नवनिर्माणाची जिद्द भविष्यात कृषी क्रांती घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. - रवींद्र कुकडे,
शेतकरी पालोरा.