शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:08 IST

शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीकरिता कर्ज काढावे की मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढावे, असा प्रश्न त्याच्यापुढे उभा असताना सरकारने विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षापासून शिष्यवृत्तीचे वाटप केले

ठळक मुद्देपवनीत आंदोलन : जिल्हाधिकाºयांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीकरिता कर्ज काढावे की मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढावे, असा प्रश्न त्याच्यापुढे उभा असताना सरकारने विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षापासून शिष्यवृत्तीचे वाटप केले नसल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शिक्षण सोडण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा पवनी तालुका तर्फे शेकडो विद्यार्थ्यांचा मोर्चा पवनी तहसील कार्यालयावर बुधवारी धडकला.मोर्चाची सुरुवात सकाळी १० वाजता चुटे रंगमंदिर येथून झाली. मोर्चात सहभागी होण्याकरिता विद्यार्थी शाळेच्या गणवेशात सकाळपासूनच सुरुवात झाली. १० पर्यंत शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी जमा झाल्यानंतर मोर्चास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी घोषणा देवून पवनी शहर दणाणून सोडले. मोर्चा मार्गक्रमण करीत डॉ.आंबेडकर चौक, गांधी चौक मार्गाने तहसील कार्यालयाजवळ पोहचताच पोलिसांनी अडविल्यामुळे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेला आयोजकांनी व विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करून तहसीलदारांनी आंदोलनस्थळी येण्याची मागणी करण्यात आली.दुपारी १.३० वाजता पवनीचे तहसीलदार गजानन कोकुडे यांनी आंदोलनकरी विद्यार्थ्यांचे मागण्यांचे निवेदन स्वीकारून ते सरकारपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिलयानंतर आंदोलन संपविले. निवेदनात दोन वर्षापासून थकीत असलेली शिष्यवृत्ती द्यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कपात न करता द्यावी व क्रिमिलीअरची अट रद्द करावी, ओबीसी जनगणना प्रकाशित करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. मोर्चाचे नेतृत्व बीआरव्हीएमचे विदर्भ संयोजक इंजि. संजय मगर, राजू झोडे, योगेश शेंडे, स्वप्नील मेश्राम, देवेश शेंडे, ऐश्वर्या दहिवले, श्रीकांत शहारे यांनी केले. मोर्चात अश्विन मेश्राम, श्रीकांत देशमुख, चंद्रकांत देशपांडे, मनू पचारे, हरीश उकरे, वासंती भुरे, पवन शेंडे, त्रिरत्न रामटेके, कार्तीक अन्नपुर्णे, प्रज्ञा मेश्राम, आशिष भुरे, अक्षय लकडस्वार, शुभम माथूरकर, पंकज पडोळे आदी उपस्थित होते.