शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
2
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
4
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
5
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
6
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
7
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
8
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
9
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
10
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
11
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
12
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
13
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
14
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
15
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
16
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
17
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
18
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
19
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
20
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता

स्वच्छतेसाठी सरसावले विद्यार्थी

By admin | Updated: October 16, 2014 23:21 IST

अस्वच्छतेसाठी शालेय विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात आरोप होतात. साफ सफाईकरिता मुलांचा सहभाग नाही अशी ओरड नेहमी पालक व शिक्षक यांच्याकडून ऐकायला येते. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यम

वरठी : अस्वच्छतेसाठी शालेय विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात आरोप होतात. साफ सफाईकरिता मुलांचा सहभाग नाही अशी ओरड नेहमी पालक व शिक्षक यांच्याकडून ऐकायला येते. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यम व नामांकीत शाळेत शिकणाऱ्या मुलाबाबद न बोलले बरे असे चित्र समाजात आहे. परंतु या सर्व आरोपांना खोट ठरवत सनफ्लॅग स्कुलच्या विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेवून वरठी येथील सर्वात जास्त घाण असलेला परिसर एकदम स्वच्छ करून दाखवला. अस्वच्छतेचे आरोप असलेले व कधीही घरात हातात झाडू न घेणाऱ्या हातानी राबविलेली मोहीम ही धडा घेण्यासारखी होती.वरठी येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. त्यात मोठ्या प्रमाणात कचरा व घाण होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून नियमित सफाई होते. पण कचरा व घाण काही जात नाही. साफ सफाई झाल्यावरही परिसरातील नागरिक कचरा बाजारात टाकतात. आठवडी बाजार गावाच्या मधात असून चारही बाजूला लोकवस्ती आहे. वरठी येथील बाजारातील घाण व कचरा यांच्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी परिसरातील लोकांच्या आरोग्यास हानीकारक आहे. याकडे अजून कुणीही लक्ष दिले नाही. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. आठवडी बाजारातील घाणीचे प्रस्थ ओळखून सनफ्लॅग स्कुलचे प्राचार्य सी.जे. धर यांनी शाळेतील वरठी येथील ८० विद्याथ्योची चमू आठवडी बाजार स्वच्छ करण्यासाठी पाठवण्याचे ठरवले. जे त्या भागात राहतात व बाजारात पडलेला कचरा किती त्रासदायक व आरोग्यास धोकादायक आहे, याची जाणीव सर्वांना व्हावी व सार्वजनिक ठिकाणी पसरणारी घाण दूर व्हावी एवढाच उद्देश होता. गावात पसरणारी अस्वच्छता यास आपणही कारण आहो व आपणच स्वच्छता ठेवली पाहिजे या संदर्भात विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्यात आली. सनफ्लॅग स्कुल वरिष्ठ श्क्षिक देवधर सिंग यांच्या नेतृत्वात शलेय विद्यार्थ्यांनी अख्खा परिसर कचरा व घाण स्वच्छ केले. स्वच्छता अभियान राबविण्याकरिता विद्यार्थ्यांच्या चमू तयार करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातून स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली. एक दिवसापूर्वी बाजार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा पडून होता. हातात झाडू व टोपली घेवून प्रत्येक विद्यार्थ्यांने हिरहिरीने स्वच्छता मोहीम फत्ते करण्यासाठी योगदान दिले. यावेळी ग्रामपंचायत ने कचरा वाहून नेण्याकरिता ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला होता. मुले मुली मोठ्या आनंदाने घाण स्वच्छ करून मिळेल त्या साधनाने कचरा ट्रॅक्टर ट्रॉलीत टाकत होते. कोणत्याही प्रकारचे टाळाटाळ न करता एकमेकांना सहकार्य करून बाजारातील स्वच्छता ऐवढेच ध्येय त्यांच्या कार्यात दिसत होते. यावेळी प्राचार्य सी.जे. धर, वरिष्ठ शिक्षक डी.सिंग, क्रीडा शिक्षक किशोर व सहाय्यक शिक्षक पारधी यांनीही हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीमेत योगदान दिले. (वार्ताहर)