शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:54 IST

परीक्षा केंद्रावर ट्रॅक्टरने डेस्क व बेंच सोडण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा ट्रॅक्टरवरून खाली पडून चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी किटाडी येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देकिटाडी येथील घटनागावात तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परीक्षा केंद्रावर ट्रॅक्टरने डेस्क व बेंच सोडण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा ट्रॅक्टरवरून खाली पडून चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी किटाडी येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. चेतन विनायक जवंजाळ रा.मिरेगाव असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने गावात तणाव असून मुख्याध्यापक, शाळेचे संचालक व ट्रॅक्टर चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीला घेऊन आंदोलन सुरु आहे.माहितीनुसार, चेतन हा मिरेगाव येथील शुक्राचार्य विद्यालयाचा इयत्ता नवव्या वर्गाचा विद्यार्थी होता. बारावी व दहावीचे परीक्षा केंद्र मुंडीपार येथे असल्याने शाळेच्या शिक्षकांनी ट्रॅक्टरद्वारे डेक्स बेंच पाठविण्याचे ठरविले. सदर साहित्य पोहचवून देण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. मुंडीपार येथील शाळेत साहित्य उतरवून ट्रॅक्टरद्वारे परत येत असताना किटाडी येथे अचानक चेतन हा ट्रॅक्टर चालकाजवळील जागेहून खाली कोसळला. यात ट्रॅक्टरच्या चाकात सापडल्याने त्याचा जागीच करुण अंत झाला. घटनेची माहिती गावात होताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. जोपर्यंत मिरेगाव येथील मुख्याध्यापक व संचालक घटनास्थळी येऊन जाहीर माफी मागत नाही व त्यांच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचा मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. वृत्त लिहिपर्यंत आंदोलन सुरुच असून घटनास्थळी आमदार बाळा काशीवार, तहसीलदार तथा लाखनी, साकोलीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Accidentअपघात