शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणामुळे विद्यार्थी घडतात

By admin | Updated: December 29, 2014 00:59 IST

शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे. शिक्षणामुळेच विद्यार्थी घडतात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना जागृत करणे हेच शिक्षणसंस्थेचे मुख्य ध्येय आहे.

भंडारा : शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे. शिक्षणामुळेच विद्यार्थी घडतात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना जागृत करणे हेच शिक्षणसंस्थेचे मुख्य ध्येय आहे. तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे. तुम्हीच तुमचे शिल्पकार आहात, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.पवनी तालुक्यातील वलनी (चौ.) येथे गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ना.बडोले बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे तर अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अ‍ॅड.आनंद जिभकाटे, उपाध्यक्ष रामदास शहारे, सुदाम खंडाईत, मनोहर देशमुख, किशोर तिघरे, जगदिश वाघमारे, विकास राऊत, देवानंद मोटघरे, सरपंच संगीता पंचभाई, किशोर भुरे, प्रा.बोरकर, इंजि. तिघरे, उपविभागीय अभियंता इंदूरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.ना.बडोले पुढे म्हणाले, आज पूर्वाश्रमीच्या भंडारा जिल्ह्यातील आपलाच माणूस मंत्री झाला म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत आहे. जिल्हा जरी वेगळा झाला असला तरी मी दोन्ही जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न प्राध्यान्याने सोडविन असे आश्वासनही त्यांनी दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे मन लावून अभ्यास करणे आवश्यक आहे व प्रगतीपथावर जावे, अंधकारातून प्रकाशाकडे जावे. आमच्या काळात शिक्षणाच्या सोयी फार कमी होत्या. तरी पण शिक्षण घेतले. तुमच्यासाठी सुसज्ज इमारत असून पोषक वातावरण आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा.समाजकल्याण विभागातर्फे दलित, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग समाजाची जबाबदारी जनतेने मंत्री म्हणून माझ्यावर सोपविली आहे. त्यास यथोचित न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन, विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपबाबत तसेच इतर अडचणीबाबत प्रश्न प्रामाणिकपणे करीन, असे ना.बडोले म्हणाले. विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचारापासून परावृत्त होऊन सकारात्मक दृष्टीकोनातून अभ्यास केला पाहिजे. तरच या विद्यार्थ्यांतून उद्याचे आय.ए.एस. आय.पी.एस. घडतील असेही ते म्हणाले.आमदार अ‍ॅड. अवसरे यांनी स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून समाजकल्याण विभागातर्फे भरीव मदत भंडारा जिल्ह्यासही मिळेल अशी अपेक्षा ना.बडोले यांचेकडून व्यक्त केली. तसेच संस्थापक तुकाराम मोटघरे यांनी जो शिक्षणाचा वृक्ष लावला त्यास संस्थाध्यक्ष जिभकाटे यांनी वटवृक्ष केला, असेही ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान व कला प्रदर्शनी लावली होती. या प्रदर्शनीचे मान्यवरांना हस्ते फित कापून उद्घाटन करून पाहणी करण्यात आली. या कार्यक्रमास नागरिक, महिला, विद्यार्थी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)