पहेला : शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आम आदमी विमा योजनेतील शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप केली जाते. परंतु वर्ष लोटले तरी २०१३ ची अर्धी शिष्यवृत्ती व सन २०१४ ची पूर्णच शिष्यवृत्ती अजूनपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे काय झाले अशी पालकात चर्चा सुरू आहे.आम आदमी विमा योजना सर्वसामान्य जनतेसाठी असून यात भूमिहीन व्यक्तीपासूून तर मजूर, अल्पभूधारक, लहान उद्योगधंदे करणारी १८ ते ५८ वय वर्षाच्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. ज्या नागरिकांचा या योजनेअंतर्गत विमा कााढला आहे अशांच्या दोन पाल्यांना जे ९ ते १२ वीमध्ये शिकत आहेत अशांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पहेला परिसरातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर केले होते व ते सर्व अर्ज मंजूर होऊन त्यांना सन २०१३ सालची अर्धी शिष्यवृत्ती मिळाली. व ही शिष्यवृत्ती १०० रुपये महिना प्रमाणे मिळणार होती. परंतु आता एक वर्ष होत आहे परंतु उरलेली शिष्यवृत्तीची रक्कम अजूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशासाठी देते की गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात थोडीफार मदत मिळणार आहे. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा
By admin | Updated: July 8, 2014 23:18 IST