लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर: नीट परीक्षा दिल्यानंतर त्यात आपण यशस्वी होणार नाही, अशी नैराश्याची भावना मनात बळावल्याने विद्यार्थ्याने स्वतःच्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना तुमसर शहराजवळील हसारा या गावी शुक्रवारी रात्री ८:३० च्या सुमारास घडली. गळफास घेतलेल्या विद्यार्थ्याचे नाव अमित रमेश बिसने (१८) असे आहे.
सुमारे दीड महिन्यापूर्वी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) अमितने दिली होती. त्याकरिता त्याने सातत्याने अभ्यास केला होता. निकालाची तो प्रतीक्षा करीत होता, परंतु आपण त्यात अपयशी होऊ अशी त्याची भावना होऊन तो मानसिक तणावात गेला. शेवटी शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास त्याने टोकाचे पाऊल घेउन घरी गळफास घेतला.या घटनेमुळे हसारा गावात एकच खळबळ माजली. निकाल लागण्याच्या आदल्या रात्रीच त्याने हे आत्मघातकी पाऊल उचलल्याने दुःख व्यक्त होत आहे.