शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
3
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
4
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
5
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
6
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
7
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
8
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
9
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
10
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
11
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
12
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
13
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
14
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
15
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
16
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
17
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
18
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
19
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 22:52 IST

राबराब राबूनही हक्काचे किमान वेतन मिळत नाही. प्राथमिक सुविधाही मिळत नाही. हक्काची मागणी केल्यास दमदाटी करून कामावरून कमी करणे या प्रकाराला सनफ्लॅगचे कर्मचारी कंटाळले होते. त्यामुळे या कंत्राटी कामगारांनी मंगळवारी दुपारपासून कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात कंपनीतील ३०० च्या वर कामगार सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसनफ्लॅग कंपनीतील कामगार आक्रमक : मागण्यांबाबत ठोस निर्णय नाही

तथागत मेश्रामवरठी : राबराब राबूनही हक्काचे किमान वेतन मिळत नाही. प्राथमिक सुविधाही मिळत नाही. हक्काची मागणी केल्यास दमदाटी करून कामावरून कमी करणे या प्रकाराला सनफ्लॅगचे कर्मचारी कंटाळले होते. त्यामुळे या कंत्राटी कामगारांनी मंगळवारी दुपारपासून कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात कंपनीतील ३०० च्या वर कामगार सहभागी झाले होते.मागण्यांबाबत व्यवस्थापनाशी चर्चा झाली; परंतु ठोस निर्णय न झाल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढला होता. त्यानंतर कामगारांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घोषणाबाजी केली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर होणाऱ्या अन्यायाचा अनेकांनी पाढा वाचला. सायंकाळी काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले हे ठिय्या आंदोलनात सहभागी होऊन ते कामगारांसह कंपनीच्या गेटसमोर बसून होते. दरम्यान पोलीस प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक झाली.यावेळी माजी आमदार मधुकर कुकडे, अ‍ॅड.आंनदराव वंजारी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कारेमोरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, वरठीच्या सरपंच श्वेता येळणे, झिया पटेल, अ‍ॅड.शशिर वंजारी, डॉ.पंकज कारेमोरे, प्रमोद तितीरमारे,माजी उपसरपंच मनोज सुखानी, प्रसन्न चकोले, अतुल भोवते, राजकपूर राऊत, चेतन ठाकूर, चेतक डोंगरे, पुष्पा भुरे, ग्रामपंचायत सदस्य संघरत्न उके, योगेश हटवार, विशाल शेंडे, अरविंद येळणे उपस्थित होते.सायंकाळी ७.३० वाजता मध्यस्थी म्हणून व्यवस्थापन व आंदोलनकर्ते यांच्यात कंपनीच्या विश्रामगृहात चर्चा झाली. यावेळी कामगारांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. चर्चेअंती व्यवस्थापन व आंदोलनकर्ते ठोस निर्णयापर्यंत आले नाही. व्यवस्थापनाने वेळ मारून नेली. मागण्याबाबत पाहतो, तपासून घेतो आणि कळवतो, या व्यतिरिक्त तोडगा निघाला नाही. यावेळी सनफ्लॅग कंपनीचे एस. के. गुप्ता, एचआर विभागाचे उपमहाव्यव्यस्थापक सतीश श्रीवास्तव, संचालक दळवी, स्थायी कामगार संघटनेचे मिलिंद वासनिक, रवी बोरकर, किशोर मारवाडे, विकास बांते, महेश बर्वेकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, तहसीलदार सूर्यकांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड हे उपस्थित होते. कामगारांचे हे आंदोलन रात्री १० वाजतापर्यंत सुरू होते.या चर्चेत १० मागण्यांपैकी एकाही मागणीवर ठोस निर्णय झाला नाही. व्यवस्थापनाने मागण्यांबाबत निर्णय घेण्यास वेळ मागितला आहे. तूर्तास निर्णय न झाल्यामुळे कामगारांमध्ये रोष होता. सनफ्लॅग कंपनीला ३० वर्षे झाली. सुरूवातीचे आंदोलन सोडले तर ३० वर्षांपासून सुरळीत असून कालच्या आंदोलनाने भूतकाळातील घटनांची पुनरावृत्ती होण्याचे संकेत दिले आहे.