शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

लेखन शैलीत बदल घडविण्याचे सामर्थ्य

By admin | Updated: January 15, 2015 22:45 IST

साहित्य, पुस्तके, कादंबऱ्या, कविता संग्रह या भेटवस्तू म्हणून देण्याची चुकीची पद्धत साहित्यीकांनी सुरु केली आहे. साहित्यीकांनी हा प्रकार बंद करून प्रामाणिक लेखन शैलीत दमदार

ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन : साहित्यिक शंकर बडे यांचे प्रतिपादनभंडारा : साहित्य, पुस्तके, कादंबऱ्या, कविता संग्रह या भेटवस्तू म्हणून देण्याची चुकीची पद्धत साहित्यीकांनी सुरु केली आहे. साहित्यीकांनी हा प्रकार बंद करून प्रामाणिक लेखन शैलीत दमदार लेखन करून वाचकांमध्ये बदल घडविण्याची ताकद निर्माण करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक शंकर बडे यांनी केले.येथील श्रीगणेश शाळेच्या प्रांगणात आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान मुंबई, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी खा.नाना पटोले तर अतिथी म्हणून आ.अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र बोरकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) के.झेड. शेंडे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार, पद्माकर मोघे, लॉयन्स क्लबचे ज्ञानेश्वर वांदिले उपस्थित होते. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शंकर बडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथोत्सवात दुर्मिळ ग्रंथ, साहित्य ग्रंथ व अन्य पुस्तकांची विक्री करण्यासाठी ठेवण्यात आली आहे. खासदार पटोले म्हणाले, विदर्भात साहित्यिक, कवी, बुद्धीजीवींची संख्या कमी नाही. मात्र विदर्भातील साहित्यिकांना पाठ्यपुस्तकात स्थान मिळत नाही. विदर्भातील साहित्यिक मागे राहू नये यासाठी साहित्य अकादमी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अवसरे यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी तर संचालन प्रा.सुमंत देशपांडे व नितीन कारेमोरे यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी शेंडे यांनी मानले. ग्रंथोत्सवाच्या विधीवत उद्घाटनापूर्वी सकाळी प्रकाश हायस्कुल ते गणेश हायस्कुल पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. यावेळी उपस्थित अतिथी व विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. पालखीवर विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करुन स्वागत केले. भजन पथक गं्रंथदिंडीचे आकर्षण ठरले. (प्रतिनिधी)