मंगलमूर्ती किसन भुरे (वय ५५) आणि राजेश किसन भुरे (४७), रा. वलनी हे सख्खे भाऊ असून त्यांचे लागूनच घर आहे. लहानसहान गाेष्टीवरून त्यांच्यात वाद हाेत असताे. शुक्रवारी (दि. १) रात्री क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाला. त्यातून हाणामारी झाली. कुऱ्हाड आणि लाकडी दांड्याने एकमेकांना मारहाण करण्यात आली. मंगलमूर्ती भुरे याने दिलेल्या तक्रारीनुसार राजेश भुरे याने कुऱ्हाडीने हल्ला केला. कुऱ्हाड पकडण्याचा प्रयत्न केला असता हाताला जखम झाली. मंगलमूर्तीचा मुलगा राजेश भांडण साेडविण्यासाठी आला असता त्याच्या डाेक्यावरही कुऱ्हाडीने हल्ला केला. तसेच राजेश याने दिलेल्या तक्रारीवरून थोरला भाऊ मंगलमूर्ती आणि पुतण्या याने दार ताेडून घरात प्रवेश केला. राजेशसह पत्नी, मुलगी व मुलाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली असे म्हटल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाेन भावांत तुफान हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:29 IST