लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी / आंधळगाव / उसर्रा : पावसाने दडी मारल्याने धानपीक धोक्यात आले आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रामटेक तुमसर मार्गावरील सालई खुर्द येथे मंगळवारी रास्ता रोको केला. रस्त्यावर टायर पेटविल्याने या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.बावनथडी प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे यासाठी डिमांड भरण्यात आली. परंतु पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी सालई खुर्द येथे आंदोलन सुरु केले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता रोखून धरला. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. या आंदोलनात नितीन लिल्हारे, उपसरपंच प्यारेलाल दमाहे, उपसभापती उमेश पाटील, अशोक पटले, श्रीकांत बन्सोड, किशोर भैरम, सरपंच महेश पटले, सरपंच राजेश मते, अमरकंठ सव्वालाखे, नंदलाल लिल्हारे, सरपंच गिरीपुंजे, भोला पारधी, रामू बघेले, महेश पराते, आनंद खोब्रागडे, प्रकाश खराबे, शिवदास लिल्हारे, रवी पटले, झनक दमाहे, यशवंत अटराये, राजू सव्वालाखे, ठेकल ठाकरे, कालू दमाहे, देवानंद ठाकरे, राजेश दमाहे, प्रवीण लिल्हारे, ईश्वर लिल्हारे, राजेश भगत, पुरुषोत्तम तुरकर, राजेंद्र सव्वालाखे, गुलाब रहांगडाले, रवी ढगे, बालचंद दमाहे, छानदेव ठाकरे, किशन दमाहे, राजू गोंड, योगेश्वर नागपुरे आदी सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी आपल्या ताफ्यासह परिस्थिती नियंत्रणात आणली.
बावनथडी पाण्यासाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 21:50 IST
पावसाने दडी मारल्याने धानपीक धोक्यात आले आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रामटेक तुमसर मार्गावरील सालई खुर्द येथे मंगळवारी रास्ता रोको केला. रस्त्यावर टायर पेटविल्याने या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
बावनथडी पाण्यासाठी रास्ता रोको
ठळक मुद्देशेतकरी संतप्त : रामटेक-तुमसर मार्ग दोन तास ठप्प