शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

सिहोऱ्यात शिवसेनेचा रास्ता रोको

By admin | Updated: July 31, 2016 00:17 IST

सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पावरून भाजपने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. वीज पुरवठा करण्यासाठी विलंब केल्यामुळे पाण्याचा उपसा झाला नाही.

शिवसैनिक आक्रमक : सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेच्या कायमस्वरूपी वीज जोडणी कराचुल्हाड (सिहोरा) : सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पावरून भाजपने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. वीज पुरवठा करण्यासाठी विलंब केल्यामुळे पाण्याचा उपसा झाला नाही. याठिकाणी कायमस्वरूपी वीजपुरवठा सुरू ठेवण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात शिवसैनिक व शेतकऱ्यांनी शनिवारला सिहोऱ्यात तुमसर-बपेरा राज्य मार्गावर रास्ता रोको व जेल भरो आंदोलन केले.भाजप व स्थानिक पदाधिकारी वीज बिलाचे १५ लाख रूपये दिल्याचे सांगत आहेत. परंतु प्रत्यक्षात विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळाने हा पैसा ३१ मार्च २०१७ पर्यंत शासनाला परत करण्याचे अटीवर उसनवारीचा आधार घेऊन दिला आहे. या आंदोलनकर्त्यांना पाटबंधारे विभागाचे कुकडे, बॅनर्जी, महातिवरणचे गडपायले, नायब शिंदे यांनी भेट घेतली. आंदोलनकर्त्यात चर्चा सुरू असताना शिवसैनिक सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा चांदपूर जलाशय पुर्णत: पाण्याने भरत नाही. तोपर्यंत वीज पुरवठा खंडीत केला जाणार नाही, अशी भूमिका घेऊन राजेंद्र पटले व अन्य शिवसैनिक व शेतकरी तुमसर बपेरा राज्य मार्गावर ठिय्या आंदोलन केले. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी यांनी आश्वासन दिले नाही. यामुळे राज्यमार्गावर शिवसैनिकांनी जेलभरो केले. पोलिसांनी जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, जिल्हा उपप्रमुख शेखर कोतपल्लीवार, कमलाकर निखाडे, भाष्कर भोयर, ओमेश्वर वासनिक, भोजराज तुरकर, योगराज टेंभरे, अमित मेश्राम, धनराज भगत, यादोराव तुरकर, जगदीश चौधरी, अंकुश पटले, कुंजीलाल पटले यांना अटक करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे व सहायक पोलीस निरीक्षक नागेश जायले यांनी बंदोबस्त तैनात केला होता. (वार्ताहर)