शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेतीचे अवैध उत्खनन, दारुचा व्यापार बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:39 IST

कान्हळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात करडीचे ठाणेदार तुकाराम कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली फिरते पोलीस स्टेशनचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देकान्हळगाव येथे मोबाईल पोलीस स्टेशन : समस्य सोडविण्याचे ठाणेदारांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : कान्हळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात करडीचे ठाणेदार तुकाराम कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली फिरते पोलीस स्टेशनचे आयोजन केले होते. यात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक तसेच दारुचा चोरटा व्यापार बंद करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर ठाणेदारांनी त्वरीत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.यावेळी सरपंच गीता रोडके, नवनिर्वाचित सरपंच दिगांबर कुकडे, भूपेश ईश्वरकर, बलवान चवळे, तुषार सोनारे, लक्ष्मण रोडके, जयदेव कुकडे, राजेश रोडके, मोहपत मंडये, ज्ञानदेव कुकडे, कवळू पंचबुद्धे, व्यंकट हिंगे, सतीश रोडके, मनोहर भोयर, सुनिल हिंगे, विलास सेलोकर, देवाजी रोडके, आनंद भोयर, चेतन मंडपे व ग्रामस्थ उपस्थित होते.मोबाईल पोलीस ठाणे कार्यक्रमात विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश रोडके यांनी संपूर्ण गावातील दारुबंदी झाली पाहिजे तसेच परिसरातून गावात येणाºया दारुवर पायबंद लागला पाहिजे, अशी मागणी केली. दारुमुळे अनेक कुटुंबांचा संसार उध्वस्त झाल्याचे ठाणेदार कोयंडे यांच्या लक्षात आणून दिले.गावातील नागरिक रस्त्यांवर बांधीत असलेल्या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अनेकांना त्रास होत आहे. त्यावर आवर घालण्यासाठी पोलिसांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. कान्हळगाव येथून रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीमुळे रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. तसेच मुंढरी व अन्य घाटांवरून होणाºया अवैध रेती चोरीमुळे करडी ते खडकी मुख्य रस्त्यांचे बेहाल झाले आहेत. त्यावर वेळीच आळा घालण्याची मागणी राजेश रोडके यांनी यावेळी व्यक्त केले. उपस्थित सर्वांनी त्यांच्या मुद्यांचे समर्थन करीत पोलीस विभागाने याकडे लक्ष घालण्याची मागणी केली.पोलीस विभागाच्या अधिकार क्षेत्रातील सर्व मागण्यांवर तात्काळ लक्ष घातले जाईल. तसेच गावातील रस्त्यांवर जनावरे बांधण्याचे प्रकरणी कान्हळगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन तसे पोलिसांना सहकार्य मागावे, असे आश्वासन ठाणेदार तुकाराम कोयंडे यांच्यावतीने देण्यात आले.