मागणी : विविध समस्यांचे प्रशासनाला निवेदनसाकोली : येथील उपविभागीय कचेरीच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम तात्कालीन ग्रामपंचायत साकोलीची किंवा तिच्या ग्राम सभेची मंजुरी न घेता सुरू करण्यात आले. आता नगरपंचायत झाल्यामुळे नगरविकासाच्या आराखडाच नव्याने करण्यात येईल. सबब ते काम तुर्तास स्थगित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. तसेच सध्या ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो व ज्या ठिकाणी वर्षानुवर्षापासून व्यावसायीकांची दुकाने आहेत त्या ठिकाणी व्यापार संकुलाची योजना आली होती व त्याकरिता विद्यमान सर्व दुकाने व इमारती पाडण्याची योजना होती. जनतेच्या व व्यावसायीकांच्या प्रखर विरोधामुळे ती योजना रद्द करण्यात आली. पण आता ती योजना पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी राजकीय शक्तीचा दुरूपयोग या कामी शासन व प्रशासनावर दबाव आणण्यासाठी करीत आहेत. ग्रामपंचायत साकोलीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे म्हणजे आता या नगराचे सिमा रेषेत ग्रामपंचायत अधिनियम १९५८ ऐवजी महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ हा लागू झाला आहे.सध्या नगरपंचायत साकोलीमध्ये शासन नियुक्त प्रशासकीय अधिकारी नगर प्रशासक म्हणून सर्वाधिकारी आहेत. लोकनियुक्त शासन नाही. त्याच प्रमाणे आता नगराच्या विकासाचा आराखडा नव्यानेच तयार करावा लागेल व लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये ते काम लोकनियुक्त प्रतिनिधी संस्थेचे आहे.नगरपंचायत साकोलीला शासन नियुक्त नगरप्रशासक आहेत. मात्र ते कधीही नगर पंचायत साकोलीचे कार्यालयात जनतेला उपलब्ध होत नाही. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्येक दिवस किमान २ तास त्यांनी ठराविक वेळेस नगर पंचायत कार्यालयात जनतेला उपलब्ध असावे, अशी मागणी करण्यात आली आहे. साकोली नगर वासीयांकडून व व्यापारी व्यावसायीकांकडून सामूहिक निवेदन देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
‘ते’ बांधकाम तत्काळ थांबवा
By admin | Updated: April 11, 2015 00:38 IST