शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूक गाड्यांचा स्थानकावर तासन्तास थांबा

By admin | Updated: November 23, 2015 00:34 IST

प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे तुमसर रोड रेल्वे स्थानकावर ...

प्रवासी थांब्याच्या ठिकाणी मालवाहू थांबतात : जंक्शन असून तुमसर रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभावतुमसर : प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे तुमसर रोड रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक एकवर प्रवासी रेल्वेगाड्याऐवजी मालवाहू गाड्या तासनतास उभ्या राहत असल्याचे चित्र आहे. यामुळे लहानमुले वयस्क मंडळींना कमालीचा शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. जंक्शन रेल्वे स्थानकाच्या सोयीसुविधा या रेल्वे स्थानकावर नाही, हे विशेष.तुमसर रोड रेल्वेस्थानक हे जंक्शन स्थानक आहे. नागपूर ते गोंदिया दरम्यान तिसऱ्या क्रमांकाचे रेल्वे स्थानक असून रेल्वे प्रशासनाला सर्वाधिक महसूल येथून जाते. मेल व एक्सप्रेस गाड्यांचा येथे थांबा आहे. दररोज हजारो रेल्वे प्रवाशी येथून ये-जा करतात, पंरतु डाऊन मार्गावरील प्रवासी रेल्वे गाड्या प्लँटफार्म क्रमांक एकवर न घेता प्लँटफार्म क्रमांक एकवर न घेता प्लॅटफार्म क्रमांक दोनवर तासन्तास उभ्या राहतात. अप मार्गावरील गाड्या प्लटफार्म क्रमांक तीनवर उभ्या राहतात. या रेल्वे स्थानकावर दररोज प्रवाशांची प्रचंड गर्दी राहते. परंतु रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.लहान मुले, महिला, वृद्धांना पायऱ्या असलेल्या फूटब्रीजवरुन चढणे आणि उतरणे कमालिचे त्रासाचे ठरत आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकाच्या दर्जानुसार विना पायऱ्याचे फूटवे-ब्रीज तयार करण्याची गरज आहे. अपंग व वृद्धांकरिता चारचाकी वाहन या रेल्वे स्थानकावर दिसत नाही. रुळ ओलांडून हे वाहन जाणार सुध्दा नाही. मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याची गरज येथे आहे. इलेक्टॉनिक डिसप्ले येथे काढून ठेवण्यात आले. त्याऐवजी पेंटीग केलेले बोर्ड येथे लावण्यात आले आहेत. रात्रीच्यावेळी ते बोर्ड दिसत नाही, यालाच आधुनिकीकरण म्हणायचे का, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)