शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

विधानसभा निवडणुकीत एसटीला २३ लाखांची कमाई

By admin | Updated: October 18, 2014 22:59 IST

बुधवारला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भंडारा एसटी विभागाच्या २३६ बसेस बुक करण्यात आल्या होत्या. पोलींग पार्ट्या पोहचविण्यासाठी निवडणूक विभागाने बसेस आरक्षित केल्या होत्या.

भंडारा : बुधवारला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भंडारा एसटी विभागाच्या २३६ बसेस बुक करण्यात आल्या होत्या. पोलींग पार्ट्या पोहचविण्यासाठी निवडणूक विभागाने बसेस आरक्षित केल्या होत्या. निवडणुकीच्या प्रासंगीक करारातुन रापमच्या भंडारा विभागाला केवळ दोन दिवसात २३ लाखांची कमाई झाली आहे.विधानसभेची पंचवार्षिक निवडणूक १५ आॅक्टोबरला राज्यात एकाच दिवशी घेण्यात आल्या. निवडणूक आयोगाने पोलींग पार्ट्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविता याव्या, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तथा खासगी गाड्यांची व्यवस्था केली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सहा विधानसभा निवडणुकीसाठी भंडारा विभागातील २३६ बसेस आरक्षित केल्या होत्या.भंडारा जिल्ह्यातील भंडारा, साकोली व तुमसर तर गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, आमगाव व तिरोडा विधानसभेसाठी निवडणूक पार पडल्या. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनसह पोहचविण्याची जबाबदारी असल्याने निवडणूक विभागाने १४ व १५ आॅक्टोंबरला बसेस आरक्षित केल्या होत्या. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सहा विधानसभेसाठी बुक करण्यात आलेल्या बसेस भंडारा आगारातुन ४३, गोंदिया आगारातुन ६६, साकोली ६६, तुमसर २८ व तिरोडा आगारातुन ३० बसेस सोडण्यात आल्या. या बदल्यात भंडारा विभागाला एका बसमागे सरासरी १० हजार रूपये प्राप्त होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रासंगीक करारातुन बस २०० किलोमिटर किंवा त्यापेक्षा कमी धावण्यावरून त्याचे बिलींग करण्यात येते. एका बसमागे १० हजार याप्रमाणे २३३ बसेसचे रापमला २३ लाखांचे दोन दिवसात उत्पन्न मिळणार आहे. (शहर प्रतिनिधी)