शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

आरोग्य विभागात संपूर्ण राज्यभरात २० हजारांपेक्षाही जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून भंडारा जिल्ह्यात ५०० च्या वर कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावली. मात्र शासन कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याने राज्यभरात कर्मचारी महासंघाच्या वतीने आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष, शासनसेवेत कायम करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत गत १५ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय बेमुदत आंदोलनाला सोमवारपासून सुरूवात केली असून शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघ भंडारा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निषेध करण्यात आला.आरोग्य विभागात संपूर्ण राज्यभरात २० हजारांपेक्षाही जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून भंडारा जिल्ह्यात ५०० च्या वर कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावली. मात्र शासन कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याने राज्यभरात कर्मचारी महासंघाच्या वतीने आंदोलन सुरू आहे.तीन टप्यात आंदोलनाला सुरूवात झाली असून शासनाने वेळीच आंदोलनाची दखल न घेतल्यास आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास कर्मचारी जबाबदारी राहणार नाहित असा इशारा संघटनेने दिला आहे.शासन आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची महाभरती करणार असून या भरतीत कंत्राटी पदावर १० वर्षापासून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतीही परीक्षा न घेता कायमस्वरूपी शासनसेवेत सामावून घेवून मानधनात वाढ करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी आंदोलनाला आरोग्यसेवक समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली राऊत, उपाध्यक्ष सुष्मा बांगडकर, नफिसा सैय्यद, भारती भांडारकर, स्मिता फुले, वैशाली राऊत, पल्लवी बावनकर, सुप्रिया मोटघरे, वर्षा बांते, कविता बारसागडे, सीमा वासनिक, संगिता आकरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.यासंदर्भात संघटनेतर्फे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्याधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेवून न्याय देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.गत १५ वर्षांपासून रुग्णांना सेवा देत आहोत. मात्र शासनाकडून दुजाभाव होत असून कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी संघटनेतर्फे आंदोलन सुरूच राहणार आहे. आंदोलनाची शासनाने योग्य वेळीच दखल घ्यावी.-वर्षा रामटेके, जिल्हाध्यक्ष कर्मचारी महासंघ, भंडारा.शासनाकडून नवनियुक्त कर्मचाऱ्यांना तसेच स्थायी कर्मचाऱ्यांना अधिक वेतन दिले जाते. मात्र तेच काम कंत्राटी कर्मचारी अल्प मानधनावर करीत आहेत. शासनाने कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करुन न्याय द्यावा.-वैशाली राऊत, महिला कर्मचारी, भंडारा.

टॅग्स :Healthआरोग्यStrikeसंप