शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाची मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते विकास योजना कागदोपत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:11 IST

लाखनी तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट : लोकप्रतिनिधी घालावे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क लाखनी : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक मुख्य रस्ते खड्डेमय आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते हे समजणे कठीण झाले आहे. पाणंद रस्त्यांच्या बिकट अवस्थेमुळे शेती विकासाला ब्रेक लागला आहे. जगाच्या पोशिंद्याची यामध्ये परवड होताना पाहायला मिळत आहे. शासनाची पाणंद रस्ते विकास योजना कागदावरच दिसत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे. शेतकरी व नागरिकही त्रस्त आहेत.

केंद्र व राज्य शासनाने नागरिकांसाठी 'शासन आपल्या दारी', 'मेरी मिट्टी मेरा देश' यासारखे बरेच उपक्रम राबविले. या योजनांची उपयोगिता किती हे शासनाला व नागरिकांनाच माहीत आहे.

लोकवर्गणीतून पाणंद रस्त्यांची सुधारणा शेती व्यवसायासाठी महत्त्वाच्या असलेल्या शेत रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, पदरमोड करून आर्थिकदृष्ट्या खालावलेल्या, मात्र मनाची श्रीमंती असलेल्या शेतकऱ्यांना लोकवर्गणीतून पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. तसे प्रयत्नही शेतकऱ्यांकडून होत असल्याचे चित्र लाखनी तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

शेजारील गाव व शेतात जाण्यासाठी अडचणी 

  • रात्री-बेरात्री शेतामध्ये जागलीकरिता, पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. रात्रीला कुणी आजारी पडले तर शेजारच्या मोठ्या गावांत किंवा शहराच्या ठिकाणी उपचारार्थ दवाखान्यात यावे लागते. मात्र, ग्रामीण रस्त्यांसह शेतशिवारातील पाणंद रस्ते आजही दुर्लक्षित आहेत.
  • लाखनी तालुक्यातील पाणंद 3 रस्त्यांच्या दुरवस्थेने शेतीची वाट बिकट झाली आहे. शासनाने पाणंद रस्ते योजनेच्या नावात बदल करीत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना असे नामकरण केले आहे. मात्र, ही योजनादेखील इतर योजनांप्रमाणे कागदावरच राहिल्याने आजही पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला नाही, ही लाखनी तालुक्यासाठी दुर्दैवी बाब मानली जात आहे.
टॅग्स :bhandara-acभंडारा