शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

निसर्गप्रेमी, पर्यटकांसाठी मचाण पर्यटन सुरु करा

By admin | Updated: May 30, 2016 00:59 IST

ज्या - ज्या वेळी चंद्रप्रकाश असेल त्यावेळी रात्रभर त्यांना तिथे बसून पर्यटन व वन्यप्राण्यांचा आनंद घेता येईल.

ग्रीन हेरिटेज पर्यावरण संस्थेची मागणी : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरजभंडारा : ज्या - ज्या वेळी चंद्रप्रकाश असेल त्यावेळी रात्रभर त्यांना तिथे बसून पर्यटन व वन्यप्राण्यांचा आनंद घेता येईल. त्यासाठी किमान दोन पर्यटकांसोबत वन विभागाचा एक व्यक्ती असावा. येथे पर्यटन होत नाही तेथे आता या निमित्ताने मचाण पर्यटन केले जावू शकेल आणि वन्य प्राण्यांना त्रासही कमी होईल. पावसाळा सोडून उन्हाळा व हिवाळा या दोन ऋतू मध्ये तो सुरु व्हावा. शासनाने याकडे विचार करून भंडारा व गोंदिया जिल्ह्यातही पर्यटक व निसर्गप्रेमी करिता मचाण पर्यटन प्रकल्प सुरु करावा, ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्थेतर्फे मागणी करण्यात आली आहे. निसर्गप्रेमी व सर्वसामान्यांना वर्षातून एकदाच वन्य प्राण्यांचे जवळून दर्शन घेण्याची संधी असते. भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील अनेक निसर्गप्रेमी व संस्था, एन.जी.ओ. च्या पदाधिकारी व सदस्यांनी वनविभागाच्या सहाय्याने लाभ घेतला. तुमसर तालुक्यातील अनेक निसर्गरमणीय जलाशयाकाठी वन विभागाने मचाणी बांधून निसर्गप्रेमींना वन्यप्राणी दर्शनाची संधी दिली. आंबागड येथील पर्वतीय, निसर्गरमणीय जलाशय येथे वन विभागाने बांधलेल्या मचाणीवर ग्रीन हेरिटेज पर्यटन व पर्यावरण संस्थेला ही संधी मिळाली. संस्थेचे संस्थापक व पर्यटनप्रेमी मो. सईद शेख यांनी मचाणीवरून वन्यप्राण्यांचे दर्शन घेतले. संध्याकाळच्या वेळी वारा सुटला. रात्रीला अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे बऱ्याचशा प्राण्यांचे दर्शन घेता आले नाही. रात्री दरम्यान काही काही क्षणी स्वच्छ चंद्रप्रकाशात रानडुकरांचा खुप मोठा कळप, वानर तथा इतर सामान्य प्राणी नजरेस पडले. रात्री ३ वाजता दरम्यान बावनथडी नहराच्या पलिकडून वाघाची डरकाळी ऐकू आली. मागच्या वर्षी या परिसरात वाघ आढळल्याची माहीती होती.निसर्गरमणीय परिसर, अनेकविध पशुपक्ष्यांचा आवाज आणि बाजूला बांध्यातून डुकरांची धावपळीने संपूर्ण जंगल परिसर जणू गजबजून उठले. या प्राणी गणना करिता वनविभागाचे एम.एन. माकडे वनक्षेत्राधिकारी नाकाडोंगरी, वी.बी. धुर्वे क्षेत्र सहाय्यक चिचोली, सविता रंगारी बिटरक्षक आंबागड, आर.सी. ठाकरे बिट सहाय्यक आंबागड, कोदाणे बिट रक्षक पवनारा, उगले वनरक्षक पौनारखारी आणि शाहीद खान सचिव सेव्ह इकोसिस्टम अँड टायगर यांचे सहकार्य मिळाले. निसर्गप्रेमी व सर्वसामान्यांना वर्षातून केवळ एकदाच वन्य प्राण्यांचे जवळून दर्शन घेण्याची जी संधी दिली जाते. मचाण पर्यटन सुरु करण्यात येणार असल्याची बातमी कळली. भंडारा गोंदिया जिल्ह्यात ही पर्यटक व निसर्गप्रेमी करिता मचाण पर्यटन प्रकल्प राबविण्यात यावे. (प्रतिनिधी)