राणी लक्ष्मी विद्यालयात खगोलज्ञान स्पर्धा : ग्रीन फे्रंडस, अंनिसचा पुढाकार, लाखनीत आयोजनलाखनी : ग्रीनफे्रंडस नेचर क्लब व अ.भा. अंधश्रध्दा निर्मुलन समिती तालुका शाखा लाखनीतर्फे आयडियल कोचिंग क्लास मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने खगोलज्ञान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवून उपस्थित विद्यार्थ्यांना अवकाश अंतराळातील विविध तारे, चांदण्या, ग्रह, आकाशगंगा, तेजोपुंज, रात्रीचे दिसणार नक्षत्रे व रास यांचा विविध तक्त्यांच्या सहाय्याने मनोरजंक पध्दतीने परिचय ग्रीनफ्रेंडसचे संघटक प्रा. अशोक गायधने यांनी करुन दिला व एक प्रकारे ‘तारे जमीन पर’ या कार्यक्रमाची अनुभूती सर्वांना मिळाली. या कार्यक्रमाला ग्रीनफ्रेंडस व अं.नि.स. चे पंकज भिगवडे, नितीन पटले, कार्तिक वंजारी व साहिल हलमारे तसेच आयडियल क्लासचे संचालक निरज मेश्राम व शिक्षक वर्ग यांच्या उपस्थित हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रा. अशोक गायधने यांनी तक्त्यांच्या सहाय्याने १२ राशी असे मेष, वृषभ, मिथून, सिंह, कर्क, कन्या, मीन, कुंभ, वृश्चिक, धनु, मकर तसेच २७ नक्षत्रे मृग, रोहिणी, शततारका, स्वाती, चित्रा, श्रवण, पुर्वाबाढा, उतराबाढा, पुर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, मघा, पुष्य, अश्विनी, भाद्रपदा, हस्त, कृतिका, पुनर्वसु, आश्लेषा, विशाखा, ज्येष्ठा, अनुराधा, मुळ, भरणी, इत्यादी नक्षत्रे त्याचप्रमाणे, ययाती, सप्तर्षी, ब्रम्हहदय हे नक्षत्र रात्रीच्या अवकाशात कसे ओळखावे याचा सोप्या पद्धतीने परिचय प्रत्यक्ष रित्या करुन दिला. यासोबतच प्रत्येक राशी-नक्षत्रामधील पुर्वापार चालत आलेल्या अंधश्रध्दा व गैरसमज सुध्दा त्यांनी दुर करुन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविला. यावेळी अंधश्रध्दा निर्मुलन समिती व अभाअंनिसचे पदाधिकारी मंगेश चांगले, अशोक वैद्य, बाळकृष्ण मेश्राम यांनी सहकार्य केले.विज्ञान दिनाचे औचित्य साधुन राणी लक्ष्मी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा देशपांडे, राष्ट्रीय हरित सेना प्रभारी शिक्षिका निधी खेडीकर व बाबुराव निखाडे यांचे सहकार्याने ‘खगोलज्ञान’ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ग्रह, नक्षत्र, तारे, आकाशगंगा, तेजोपुंज, राशी यावर आधारित वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणारे प्रश्न विचारण्यात आले. हि स्पर्धा वर्ग ५ ते ७ तसेच वर्ग ८ वा, ९ वा व १० व्या वर्गात स्वतंत्रपणे घेण्यात आली. या स्पर्धेत वर्ग १० व्या वर्गातून हार्दिका सरोदे प्रथम, लता तलमले हिला द्वितीय तर रितीका कराडे ला तृतीय क्रमांक देण्यात आला. प्रोत्साहनपर क्रमांक प्रिती वंजारी व स्नेहा नागपुरे यांना देण्यात आला. वर्ग ९ व्या वर्गामध्ये प्रथम क्रमांक ऐश्वर्या बारस्करला, द्वितीय क्रमांक प्रतिक्षा रामटेके तर तृतीय क्रमांक तित्यश्री पडोले व जान्हवी गजभिये यांना देण्यात आला. प्रोत्साहनपर क्रमांक करिश्मा लुटे, श्वेता बांगडकर, अंगेश्वरी हलमारे यांना देण्यात आला. ८ व्या वर्गामधून प्रथम क्रमांक करिना बोंद्रे, द्वितीय क्रमांक सुचिता बावनकुळे, तृतीय क्रमांक लीना सरोदे तसेच प्रोत्साहनपर क्रमांक सुचिता मोहतुरे व कल्याणी पचारे यांना देण्यात आला. वर्ग ५ ते ७ या वर्गामधून प्रथम क्रमांक समिक्षा गभने हिला देण्यात आला. प्रोत्साहनपर क्रमांक रिना खेडीकर, निकता भांडारकर, दिव्या भिवगडे व दिक्षा निखाडे यांना देण्यात आला. सहभागपर क्रमांक ओझर गिऱ्हेपुंजे हिला देण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
‘तारे जमीन पर’ कार्यक्रमात अनुभवले तारे, चांदण्या, ग्रह
By admin | Updated: March 12, 2016 00:44 IST