शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पाऊस; पवनीत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:48 IST

जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस बरसत आहे. या पावसाला जोर नसला तरी पवनी तालुक्यात मात्र अतिवृष्टी झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात २८.१ मि.मी. पावसाची नोंद : शेतकरी सुखावला असला तरी उत्पादनात घट होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस बरसत आहे. या पावसाला जोर नसला तरी पवनी तालुक्यात मात्र अतिवृष्टी झाली आहे. मागील २४ तासात २८.१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. पवनी तालुक्यात सर्वाधिक ११२ मि.मी. पाऊस बरसला आहे.पवनी तालुक्यात सर्वाधिक ११२ मि.मी., लाखांदुरा ३९ मि.मी., तुमसरात १५.३ मि.मी., मोहाडीत १२.८ मि.मी., लाखनीत ९.२ मि.मी., भंडाºयात ७.७ मि.मी. तर साकोलीत केवळ ३.४ मि.मी. असा १९९.४ मि.मी. म्हणजे सरासरी २८.१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.धानपीक पाण्याखालीमासळ : कालपासून परिसरात संततधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोवणी केलेले धानपिक व पºहे पाण्याखाली गेल्याने, शेतकºयांपुढे संकट उभे ठाकले आहे. २४ तासात मासळ परिसरात १०९.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.यावर्षी दुष्काळ पडण्याची चिन्हे दिसत असतानाच अतिवृष्टीने आश्चर्यचकीत केले आहे. या पावसाचा फटका मासळसह संपूर्ण लाखांदूर तालुक्यात बसला. परिसरातील नदी, नाले दुथडी वाहत असून सखल भागात ३ ते ४ फुट पाणी साचले आहे. गावखेड्यातील अनेक छोट्या पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रवाशांची तारांबळ झाली आहे.मासळ ते किटाडी या रस्त्यावर घोडेझरी तसेच किटाडी जवळील नाल्यावरून ३ ते ४ फुट पाणी वाहत असल्याने त्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. घोडेझरी ते हरदोली वाकल या दरम्यान सोनेगाव समोरील व हरदोली जवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने तो मार्ग बंद झालेला आहे. दरम्यान तई गावाजवळून जाणारी चुलबंद नदी दुथडी भरून वाहत असून धोक्याची पातळी ओलांडत आहे. कोणत्याही क्षणी याही मार्गाची वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आहे. इकडे मासळ बेलाटी कोंढा या मार्गावर सुद्धा ठिकठिकाणी १ ते २ फुट पाणी साचल्याने वाहतूक तुरळक सुरु आहे. मासळ, बाचेवाडी मार्गावरील पुल पाण्याखाली आल्याने रहदारी बंद आहे. दरम्यान मासळ परिसरात अतिवृष्टीमुळे आज शाळा, कॉलेज ओस पडले होते. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनी सुटी दिली. पावसाने शेतकरी सुखावला असला तरी आजच्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली बुडल्याने उत्पादनात कमालीची घट होण्याची चिन्हे आहे. ज्या शेतकºयांचे पºहे रोवणीविना शेतात होते. तेसुद्धा पाण्याखाली आल्याने शेतकºयांवर चिंतेचे सावट पसरले आहे.कालव्याची पाळ फुटण्याच्या मार्गावरकोंढा (कोसरा) : गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे डावा कालवा सोमनाळाजवळ फुटण्याची शक्यता आहे. कालवा फुटल्यास बाजूच्या शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात पवनी, लाखांदूर तालुक्यात वाहत असलेला गोसेखुर्द प्रकल्पाचा डावा कालवा आहे. पावसाअभावी रोवणी झाली नव्हती. शेतकºयांच्या मागणीनुसार वाही धरण विभागाने डावा कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. डावा कालव्याचे काम मागील तीन वर्षापासून धिम्म्यागतीने सुरू आहे. सोमनाळा गेट क्र. १ च्या पुढे व मागील बाजूस काम पूर्ण झाले नाही. माती काढून पिचिंगचे काम सुरु आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने काम अपूरे असतानाही पाणी सोडावे लागले. परंतु डावा कालवा गेट क्र. १ येथे नियमित कर्मचारी डावा कालवा विभागाने ठेवला नाही. यामुळे कोणीही येतात दरवाजे खुले करतात. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड आहे. गेटमधून पाणी आजूबाजूला वाहत आहे. त्यामुळे डावा कालवा फुटण्याच्या स्थितीत आहे. डावा कालव्याची पार फुटल्यास शेकडो हेक्टर जमीन जलमय होऊ शकते.पालांदूर परिसरात १४८ मि.मी. पाऊसपालांदूर : सोमवारला ५६.६ मि.मी. पावसाचे हजेरी लावल्यानंतर मंगळवारला सकाळपासून जोरदार पावसाच्या सरीवर सरी बरसल्या. दुपारी २ पर्यंत पावसाने नदी नाल्या दुथडी भरून वाहू लागल्या. शेतात पाणीच पाणी साचले आहे. विद्यार्थी जाऊ न शकल्याने शाळांना अघोषित सुटी मिळाली. रोवणीच्या कामावर गेलेले मजूर २-३ तासातच घरी परतले. खराशी पुलावर रस्त्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. चालू हंगामातील हा मोठा पाऊस होता. मºहेगावात भारत बेंदवार यांचे घर पडल्याने त्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तहसीलदार राजीव शक्करवार यांनी पालांदूरला भेट देऊन माहिती घेत आहेत.