प्रकल्पग्रस्त संतप्त : आश्वासनानंतर आंदोलन मागेपवनी : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे नवीन पाथरी पुनर्वसित गावातील अतिक्रमणासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारला दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत पवनी तहसीलदारांच्या कक्षात चार तास ठिय्या आंदोलन केले. तहसीलदार नरेंद्र राचेलवार यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन मागे घेतले.पाथरी पुनर्वसनाच्या जागेवर अतिक्रमण करून या प्रकल्पग्रस्तांचा रस्ताही बंद करण्यात आला. या संबंधी अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अतिक्रमणधारकासोबत प्रकल्पग्रस्तांचा वाद झाला. त्यामुळे येथील काही प्रकल्पग्रस्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी ३१ जुलैला पाथरी येथे निदर्शने करण्यात आले. त्यावेळी अधिकाऱ्यांकडून मागण्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही.प्रकल्पग्रस्त दुपारी ४ वाजता मागण्या घेऊन तहसीलदारांच्या कक्षामध्ये भेटण्याकरिता गेले. परंतु तहसीलदार उपस्थित नव्हते. जोपर्यंत तहसीलदार येऊन मागण्या सोडविणार नाही तोपर्यंत येथून हटणार नसल्याची भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली. त्यामुळे याची सूचना तहसीलदारांना देण्यात आली. तहसीलदार राचेलवार रात्री ७.३० वाजता येऊन प्रकल्पग्रस्तांशी चर्चा सुरु केली. प्रकल्पग्रस्त मागण्यांवर ठाम होते. प्रकल्पग्रस्तांनी रात्रभर तिथेच ठिय्या देण्याची तयारी दर्शविली. कोंडी फुटत नसल्यामुळे शेवटी राचेलवार यांनी पोलीस विभाग, पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तात्काळ उद्याला कारवाई करण्याचे निर्देश दिले. रात्री ८ वाजता त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी ४ तास चाललेले आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. आंदोलनाचे नेतृत्व संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे, सोमेश्वर भुरे, धर्मराज भुरे, अंताराम हटवार यांनी केले. आंदोलनात विश्वनाथ वाडीभस्मे, केशव हटवार, नंदलाल भुरे, दिगांबर कुर्झेकर, हिवराज हटवार, परमेश्वर चंदनबावने, धम्मानंद रोडगे, उदाराम भुरे, होमराज कुर्झेकर, केवळराम मरघडे, कैलाश मरघडे, रतीराम कुर्झेकर, गंगाधर बोरकर, शैलेश मरघडे, जयदेव भुरे, नरेश बोरकर यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल् पग्रस्त सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
पाथरीच्या प्रकल्पग्रस्तांचा तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या
By admin | Updated: August 13, 2015 01:24 IST