शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

एसटीच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ

By admin | Updated: May 16, 2015 01:08 IST

बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य पूर्ण करण्यात एसटीचे आगार अपयशी ठरले आहे.

भंडारा : बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य पूर्ण करण्यात एसटीचे आगार अपयशी ठरले आहे. ग्रामीण व शहरी भागाची लोकवाहिनी असलेल्या एसटीची गती काळाच्या ओघात मंदावली असून प्रवाशांची दारोमदार खासगी वाहतुकीवरच आहे. त्यामुळे खासगी प्रवाशी वाहतूक फोफावली आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद असल्याच्या एसटीची दिवसेंदिवस दुरवस्था कमालीची वाढत आहे. ग्रामीण भागात बसेस वेळेवर सुटत नाही. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागते. परिणामी त्या वेळेवर पोहोचत नाही. भंडारा, साकोली व तुमसर शहरात प्रत्येकी एकेक एसटीचे आगार आहे. तसेच तिन्ही आगाराच्या बसेस अन्य जिल्ह्यातही धावतात. येथून ग्रामीण भाग व इतर स्थानकातून एसटी गाड्या सुटतात. मात्र या डेपोच्या अनेक गाड्या भंगार झालेल्या असून त्यांना नवीन गाड्यांची प्रतीक्षा आहे. महामंडळाने एसटीला लोकाभिमुख करण्यासाठी अनेक योजना आणल्या. ग्राहकांना अभिवादन करण्याचीही योजना सुरू केली होती. काही दिवस या योजनेचा गवगवाही करण्यात आला होता. मात्र ही पद्धत कधीचीच औट घटकेची ठरली. एसटीचे उत्पन्न वाढावे म्हणून अनेक योजना सुरू करण्यात आल्या तरी त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तसेच एसटीचे वाहक यांच्याकडून प्रवाशांना बऱ्याचदा अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी असून त्यांनाही याबाबत वरिष्ठांकडून सूचना देण्याची गरज आहे. सहकाऱ्यांमध्ये सूचनांनी सुधारणा होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.नियमित पासधारकांना एसटीच्या अनियमितपणामुळे त्यांच्या नियोजित वेळेत व ठिकाणी पोहोचता येत नाही. शाळा जेव्हा सुरू असतात त्यावेळीही एसटीमुळे शाळेत जाण्यास उशीर झाला, अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतात. ग्रामीण भागातील बसफेऱ्या म्हणजे तेथील प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. बसमधील आसनांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. एसटीच्या बसमध्ये धूळ, माती, कागदाचे चिटोरे, प्लॅस्टीक बॅग असतात. काही वेळा उलटीही असते. एसटीच्या स्वच्छतेकडे व्यवस्थापकांचे दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी प्रवाशी करतात. याकडे लक्ष पुरविणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना गरजेचे आहे. एसटीला विविध समस्यांचा विळखा पडला आहे. काही वेळा डेपोवरील शौचालय बंद असतात. अधिकचे पैसे तेथे घेतले जातात. या सर्व बाबींचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होत असून खासगी वाहतूकदारांचे चांगलेच फावले आहे. (प्रतिनिधी)