शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा भेडसावतेय वेतनाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

एस.टी.महामंडळात ४० हजार चालक, ३० हजार वाहक तांत्रिक व प्रशासकीय ३३ हजार कर्मचारी आहेत. महाराष्ट्रात एकूण ५१ आगार आहेत, सर्व कर्मचाऱ्याच्या वेतनापोटी एस.टी.चे २९० कोटी रुपये दर महिन्यात खर्च होतात. परंतु मागील दीड वर्षापासून वेतन होते की नाही, अशी चिंता प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांना होत आहे. कोविड-१९ आजाराने एस.टीची चाके ठप्प झाली होती. 

 राहुल भुतांगेलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एस.टी महामंडळाची अर्थिक स्थिती हलाखीची झालेली आहे. डिझेलला पैसे नाहीत. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास पैसे नाहीत. अशा एक ना अनेक अडचणींना एस. टी कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. दर महिन्यात वेतन होते की नाही, अशी चिंता कर्मचाऱ्यांना मागील दीड वर्षापासून भेडसावत आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात सात तारखेला होणारा वेतन अद्यापही झाले नसल्यामुळे एक लाख तीन हजार एस.टी.कर्मचारी संकटात सापडलेले आहेत. एस.टी.महामंडळात ४० हजार चालक, ३० हजार वाहक तांत्रिक व प्रशासकीय ३३ हजार कर्मचारी आहेत. महाराष्ट्रात एकूण ५१ आगार आहेत, सर्व कर्मचाऱ्याच्या वेतनापोटी एस.टी.चे २९० कोटी रुपये दर महिन्यात खर्च होतात. परंतु मागील दीड वर्षापासून वेतन होते की नाही, अशी चिंता प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांना होत आहे. कोविड-१९ आजाराने एस.टीची चाके ठप्प झाली होती. तेव्हापासून एस.टीची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे एसटीची शासनात विलीनीकरण करण्याची मागणी होत आहे. एस. टी चे शासनात विलिनीकरण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा संघटनेने केलेला आहे. ज्याप्रमाणे राज्य शासनाने राज्यातील विविध ३१ महामंडळातील कार्यरत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे  मग एसटी महामंडळ चा समावेश का करण्यात येत नाही? असा सवाल उपस्थित होत असताना एस. टी. महामंडळाला तोट्यात असल्याचे कारण दाखवून शासन वेळकाढूपणा करत आहे. एस.टी.ही प्रवासाचे आधारस्तंभ आहे. प्रवाशांना एस. टी. महामंडळावर अक्षम्य विश्वास आहे.   एस.टी.ही प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. प्रवाशांना सेवा सवलत देत आहे.  मात्र   शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.

कोविड-१९मुळे गत दीड वर्षापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची सतत वेतनासाठी भटकंती होत आहे. कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व एसटीला शासनात विलीन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे.- मनोज मोटघरे, अध्यक्ष कामगार संघटना, तुमसर

 

टॅग्स :state transportएसटी