शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

एसटी चालकांची होणार ‘अल्कोहोलिक टेस्ट’

By admin | Updated: January 13, 2015 22:53 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीचे 'सुरक्षित प्रवास' हे ब्रिद आहे. मात्र, एसटी चालक कर्तव्यावर मद्यप्राशन करीत असल्याने अपघात घडतात. त्यामुळे चालकांवर अंकुश रहावा,

राज्यातील सर्व आगारात तपासणी : रात्र मुक्कामी चालकांवर करडी नजर, कुठेही होऊ शकते तपासणीप्रशांत देसाई - भंडारामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीचे 'सुरक्षित प्रवास' हे ब्रिद आहे. मात्र, एसटी चालक कर्तव्यावर मद्यप्राशन करीत असल्याने अपघात घडतात. त्यामुळे चालकांवर अंकुश रहावा, यासाठी रापमने आगार प्रमुखांकडे ब्रिथ अ‍ॅनालायझर (अल्कोहोलिक टेस्ट) मशीन दिली असून याद्वारे कर्तव्यावर जाणाऱ्या चालक व वाहकांची तपासणी होणार आहे. यात मुख्यत्वे, रात्र मुक्कामी जाणाऱ्या बसच्या चालकांची व वाहकांची तपासणी होणार आहे.रापमंच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक रत्नपारखी यांनी याबाबत, राज्यातील सर्व प्रादेशिक व्यवस्थापक व विभागीय नियंत्रकांना पत्र व ब्रिथ अ‍ॅनालायझर मशीन पाठविण्यात आली आहे. या मशिनच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहकांची तपासणी करणार आहे. मागील काही वर्षात एसटी बसेसचे अनेक अपघात घडले आहेत. यात चालक मद्यप्राशन करून असल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी रापमंला प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने अपघात विरहीत प्रवास ही संकल्पना राबविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने चालक कर्तव्यावर जाण्यापूर्वीच त्याची बसस्थानकावर अल्कोहोलिक मशिनच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी मोहीम राबविणाररापमच्या प्रादेशिक कार्यालयाने भंडारा विभागीय कार्यालयाला दोन मशिन पाठविल्या आहेत. सध्या आगारस्तरावर ही तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर विभागीय नियंत्रकांच्या मार्गदर्शनात विभागीय स्तरावर विशेष मार्ग तपासणी पथक स्थापन करून मुक्कामी जाणाऱ्या एसटीच्या चालक व वाहकांची तपासणी कधीही व कुठेही करण्यात येणार आहे.सहा आगारांना दोनच मशिनप्रादेशिक कार्यालयाने भंडारा विभागीय कार्यालयाला केवळ दोनच मशिन पाठविल्या. मात्र, विभागीय कार्यालयात भंडारा, पवनी, तुमसर, साकोली, तिरोडा, गोंदिया हे सहा आगार आहेत. वाहक-चालकांची तपासणी करण्यासाठी आणखी मशिनची गरज आहे. सध्या भंडारा व पवनी आगारातील तपासणी कार्याक्रम आटोपून मशिन तिरोडा व तुमसर येथे पाठविण्यात आल्या आहेत.अशी होणार तपासणीब्रिथ अ‍ॅनालायझर मशिन तोंडाला लावून पाच सेकंद फुंकावे लागेल. मद्यप्राशन करून असेल तर, हिरवा लाईट लागेल. अल्कोहोलचे प्रमाण असल्यास लाल लाईट लागून बिप वाजेल व अल्कोहोलच्या प्रमाणाची टक्केवारी दिसेल. यात मशिन ३० एमजी टक्क्यांवर प्रमाण दाखवित असल्यास वाहक किंवा चालक दोषी आढळून येईल. त्यानंतर त्याच्यावर रापम कारवाई करण्यात येईल. दरम्यान विभागीय कार्यालयाच्या मार्ग तपासणी पथकाचे दोन गट पाडून चालक वाहकांची ही तपासणी होणार आहे.