शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

एसटी चालकांची प्रशिक्षण प्रक्रिया कोरोनामुळे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST

परिवहन महामंडळातर्फे २०१९-२० मध्ये चालक कम वाहक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये ४०७  वाहनचालकांची भरती जाहिरात निघाली होती. यामध्ये २३६ जण अंतिम निवड यादीमध्ये पात्र झाले होते. त्यातील २२७ चालक मेडिकल चाचणीस पात्र झाले. त्यातील ७२  जणांची चालक तथा वाहकपदी नेमणूक झाली, तर १०५ चालकांचे अठ्ठेचाळीस दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देमहामंडळाने दिली होती स्थगिती : लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण होणार

संतोष जाधवरलाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा :  प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळातर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहन चालकांची भरती करण्यात येते. दरवर्षीच एसटी  महामंडळात अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होतात. तेवढेच कर्मचारी नव्याने भरती केले जातात.  मात्र, गतवर्षी आलेल्या कोरोना संसर्गामुळे एसटीची चाके पहिल्यांदाच थांबली आणि त्यामुळे भरती केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही थांबले. काही जणांची नियुक्तीही रखडली आहे. परिवहन महामंडळातर्फे २०१९-२० मध्ये चालक कम वाहक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये ४०७  वाहनचालकांची भरती जाहिरात निघाली होती. यामध्ये २३६ जण अंतिम निवड यादीमध्ये पात्र झाले होते. त्यातील २२७ चालक मेडिकल चाचणीस पात्र झाले. त्यातील ७२  जणांची चालक तथा वाहकपदी नेमणूक झाली, तर १०५ चालकांचे अठ्ठेचाळीस दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तर अद्याप ५० वाहनचालकांचे ८०  दिवसांचे प्रशिक्षण अद्याप बाकी आहे. मात्र, अद्याप काही जणांना अंतिम वाहन चालन चाचणीचा निकाल लागला नसल्याने नियुक्ती देता आलेली नाही. 

एसटी वाढविणार उत्पन्नाचे विविध साेर्सेस

कोरोनाचा संसर्ग वाढताच एसटी महामंडळाने संपूर्ण वाहतूक बंद ठेवली होती. सहा ते सात महिने एसटीच्या फेऱ्या बंद असल्याने महामंडळाचे उत्पन्नही घटले  होते. त्यामुळे सद्य: स्थितीत डिझेल, कर्मचाऱ्यांचा पगार, कार्यालयीन खर्चासोबतच अनावश्यक होणारा खर्च कसा टाळता येईल या बाबींवर एसटी महामंडळाने लक्ष केंद्रित केले असून, नवनवीन उत्पन्नाची साधने वाढविण्यासाठी  महामंडळ आता प्रयत्न करणार आहे. एसटी महामंडळाने बदलत्या काळानुसार  अनेक निर्णय घेतले आहेत. यामध्ये विविध शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या जागांवरती नवनवीन प्रकल्प राबवून तसेच शासकीय वाहनांची दुरुस्ती, स्वत:चे एसटीचे पेट्राेलपंप यातून उत्पन्न कसे वाढेल याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

प्रशिक्षणार्थी चालक म्हणतात...

एसटीचे ४८ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. मात्र, अद्यापही ऐंशी दिवसांचे प्रशिक्षण माझे झालेले नाही. त्यातच लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे प्रशिक्षण थांबले होते. आता पुढील प्रक्रिया कधी होणार याकडेच माझे लक्ष लागून आहे. कारण मी माझी खासगी नोकरी सोडली आहे.प्रशिक्षणार्थी, चालक. 

राज्य परिवहन महामंडळाने आमचे प्रशिक्षण कोरोनामुळे थांबविले होते.त्यामुळे आम्ही सध्या  घरीच बसून आहोत. मात्र, आता कोरोना नियम शिथिल होत असून  प्रशिक्षणावरील स्थगिती उठून पुन्हा लवकरच सेवेत रुजू होण्याची संधी मिळेल, अशी मला आशा आहे. प्रशिक्षणार्थी, चालक.

कोरोनामुळे एसटीच्या फेऱ्या जशा बंद झाल्या होत्या तसेच चालक - वाहकांच्या प्रशिक्षणालाही स्थगिती महामंडळाने दिली होती. मात्र, आता नुकतेच वरिष्ठ कार्यालयाकडून प्रशिक्षणार्थी चालक सेवा, तसेच प्रशिक्षणे पूर्ववत करण्याचे आदेश दिल्याने तत्काळ या उमेदवारांना वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रशिक्षणासह सेवेत सामावून घेण्यात येईल. काेराेनामुळे ही प्रक्रीया संपूर्ण राज्यभरच थांबली हाेती. त्यानंतर वेळाेवेळी मिळालेल्या शासकीय निर्देशानुसार व वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार लवकरच प्रशिक्षणार्थींचा विषय मार्गी लागेल.- डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी,भंडारा 

 

टॅग्स :state transportएसटी