शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

कंटेनरवर एसटी बस आदळली, 18 प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:45 IST

साकोली आगाराची नागपूर-गोंदिया (एमएच ४० एन ८६०३) ही विठाई बस नागपुरवरून भंडाऱ्याकडे जात होती. ऑटोरिक्षा भरून असलेला एक कंटेनर या बसच्या समोर धावत होता. शहापूर येथील उड्डाणपूलावर अचानक कंटेनर चालकाने ब्रेक मारले आणि मागून भरधाव असलेली एसटी बस कंटेनरवर जावून आदळली. काय झाले कळायच्या आतच बसमध्ये एकच हलकल्लोळ उडाला.

ठळक मुद्देशहापूर उड्डाणपुलावरील घटना : दोन गंभीर, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर/जवाहरनगर : समोर धावणाऱ्या भरधाव कंटेनरने अचानक ब्रेक मारल्याने त्यावर एसटी बस आदळून झालेल्या अपघातात १८ प्रवासी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील शहापूर उड्डाणपूलावर बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की एसटी बसच्या समोरील भागाचा पूर्णत: चुराडा झाला. सुदैवाने यात कुणाचा प्राण गेला नाही आणि बहुतांश प्रवाशी किरकोळ जखमी झाले. जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सायंकाळी १३ किरकोळ जखमींना सुटी देण्यात आली होती. सध्या पाच जणांवर उपचार सुरू आहे. साकोली आगाराची नागपूर-गोंदिया (एमएच ४० एन ८६०३) ही विठाई बस नागपुरवरून भंडाऱ्याकडे जात होती. ऑटोरिक्षा भरून असलेला एक कंटेनर या बसच्या समोर धावत होता. शहापूर येथील उड्डाणपूलावर अचानक कंटेनर चालकाने ब्रेक मारले आणि मागून भरधाव असलेली एसटी बस कंटेनरवर जावून आदळली. काय झाले कळायच्या आतच बसमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. शहापूर येथील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना भंडाराच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी १८ प्रवाशांपैकी १३ प्रवाशांना किरकोळ दु:खापत असल्याने सायंकाळी सुटी देण्यात आली. सध्या पाच जखमी उपचार घेत असून त्यात दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. ही बस चालक नरेश मोजे चालवित होता तर वाहक गोपाल राठोड होता. हे दोघेही या अपघातात किरकोळ जखमी झाले. घटनास्थळावर एसटी बसची अवस्था पाहून भीषण अपघात झाल्याचे भासत होते. सुदैवाने या अपघातात कोणाचाही प्राण गेला नाही. जवाहरनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद घेण्यात आली. एसटी बसचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी मिळाली. त्यांनी लगेच जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. फारूख रिजवी यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ सर्व डॉक्टरांना उपचारासाठी तात्काळ बोलावून घेतले. सुरूवातीला हा अपघात भीषण असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे सर्व डॉक्टरांना रुग्णालयात पाचारण करण्यात आले होते. 

एसटीची जखमींना मदत एसटी बसला अपघात झाल्याचे माहित होताच विभागीय नियंत्रणक विनय गव्हाळे, विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. चंद्रकांत वळसकर, मुख्ययंत्र अभियंता गजानन नागुलवार, भंडारा आगार प्रमुख फाल्गुन राखडे, बसस्थानक प्रमुख सारीका निमजे यांनी घटनास्थळी व त्यानंतर रुग्णालयात धाव घेतली. एसटीच्यावतीने किरकोळ जखमींना ५०० रुपये तर इतर जखमींना एक हजार रुपये तात्काळ देण्यात आली.

अपघातातील जखमी

सुखचरण नत्थूलाल रामटेके (५०), सवीता सुखराम रामटेके (४५) रा. जोधीटोला जि.बालाघाट, विजय दिवाकर लोखंडे (४५), जयश्री विजय लोखंडे (३०) रा. खमारी जि. गोंदिया, प्यारेलाल जोशी (७२) रा. पळसगाव जि. गोंदिया, नरेंद्र नेतराम फाये (३४) रा. गोंदिया, सावित्री राजेश मरकाम (२०) रा. किरणापूर जि. बालाघाट, राजेश भीकू मरकाम (२५) रा. किरणापूर जि. बालाघाट, रवी श्यामलाल सोनवाने (३२), मीना रवी सोनवाने (२९) रा. भुजाडोंगरी जि. बालाघाट, विशाखा विजय राघोर्ते (२०) रा. सालेबर्डी ता. भंडारा, शबाना अलताब कुरैशी (३८), अतीम अल्ताब कुरैशी रा. भंडारा, अपुर्वा मोरेश्वर सेलोकर (२१) रा. भंडारा, ज्ञानीराम जीवतू जनबंधू (७३) रा. मांगली ता. लाखनी, सुखदेव राजू दिघाडे रा. कोंढी जवाहरनगर, दिव्या बेलेंद्र निंबार्ते रा. भंडारा, शुभांगी रमेश रामटेके (३५) रा. सावरी जवाहरनगर, तनवीर सैयद रा. पळसगाव जि. गोंदिया अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

 

टॅग्स :Accidentअपघात