शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा प्रबोधिनीची निवड चाचणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 00:22 IST

अध्यापनाव्यतिरिक्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या एका शिक्षकाची बदली झाल्याने क्रीडा प्रबोधिनी चाचण्या रखडल्या आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष : आंदोलनाचा इशारा, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनतुमसर : अध्यापनाव्यतिरिक्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या एका शिक्षकाची बदली झाल्याने क्रीडा प्रबोधिनी चाचण्या रखडल्या आहेत. यासंदर्भात खेळाडूंच्या पालकात तीव्र असंतोष असून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.अध्ययनासोबतच क्रीडा क्षेत्रात आवड असल्याने जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी राष्ट्रीय क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथे निवडीकरिता क्रीडा कौशल्य विकसीत करण्याकरिता दावेझरीटोला येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत अ.वा. बुद्धे खेळाडूंना मैदानावर सराव करवून घेतात. दररोज सकाळी ५ ते ७ व सायंकाळी ५.३० ते ७०० या वेळेत सुरू राहते.निवड चाचण्या जवळ आल्यावरही सराव सध्या बंद आहे. अ.वा. बुद्धे यांचे स्थानांतरण लाखांदूर तालुक्यात करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात अ.वा. बुद्धे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रबोधिनी करिता प्रशिक्षण सराव सुरू केला होता. त्यांच्या अंतिम चाचण्या देव्हाडी येथील बड्डा क्रीडांगणावर घेण्यात येत होत्या. स्थानांतरणामुळे चाचण्या केव्हा व कुठे घ्यावा, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. या प्रकल्पातून आतापावेतो सुमारे १६० खेळाडूंची क्रीडा प्रबोधिनी निवड झाली आहे. यात राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत किशोरी गटात मयुरी लुटे हिने राष्ट्रीय विक्रम नुकताच नोंदविला. शशकिला आगाशे रा. निलज हीने भारतीय संघात सायकलींग निवड करण्यात आली. आकाश शेंडे यांची जागतिक क्रॉस कंट्री अंडर १६ हंगेरी येथे निवड झाली. ज्युनिअर हॉकी संघ महाराष्ट्राची संघाची कर्णधार म्हणून कामगिरी बजावली. या क्रीडा नैपूण्य चाचणीतूनच भंडारा जिल्ह्यातील खेळाडू पुढे आले आहेत. या प्रकल्पाकरिता झटणाऱ्या शिक्षण अ.वा. बुद्धे वर अन्याय कदापी खपवून घेणार नाही, असा गंभीर इशारा १६० पालकांनी निवेदनातून दिला आहे. बुद्धे यांचे वेतन मागील आठ महिन्यापासून बंद आहे. येथे जि.प. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)