शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला हरविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने भंडारा जिल्ह्यात गावसीमाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 14:33 IST

भंडारा जिल्हा सीमाबंदी सारखीच अनेक ठिकाणी गाव सीमाबंदी करून गावाभवताल जणू तटबंदीच उभारले आहे. महानगर आणि रेड झोनमधून चोरून लपून गावात शिरू पाहणाऱ्यावर ग्रामरक्षा दलाची करडी नजर असून २४ तास येथे खडा पहारा असतो.

ठळक मुद्देबाहेरून येणाऱ्यांवर लक्षग्राम रक्षादलाचा खडा पहारा

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रीन झोनमध्ये भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग होवू नये म्हणून प्रशासनासोबत गावकरीही पुढे सरसावले आहेत. जिल्हा सीमाबंदी सारखीच अनेक ठिकाणी गाव सीमाबंदी करून गावाभवताल जणू तटबंदीच उभारले आहे. महानगर आणि रेड झोनमधून चोरून लपून गावात शिरू पाहणाऱ्यावर ग्रामरक्षा दलाची करडी नजर असून २४ तास येथे खडा पहारा असतो. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला हरवायचेच, असा या गावकऱ्यांनी चंग बांधला आहे.भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत सुदैवाने एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही. प्रशासनाने खबरदारीसाठी कठोर उपाययोजना केल्या आहे. जिल्ह्याच्या नऊ सीमा प्रशासनाने सील केल्या आहे. मात्र रेड झोनमधील अनेक जण नजर चुकवून आणि लपूनछपून गावात शिरत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाला कोरोनाचा धोका संभवत आहे. प्रशासन उपाययोजना करीत असला तरी ग्राम पातळीवर प्रत्येकाची चौकशी करणे प्रशासनाला अशक्य आहे. त्यासाठी भंडारा जिल्ह्यातील काही गावांनी आपल्या गावाच्या चक्क सीमा सील केल्या आहेत. गावाच्या चोहबाजूला लाकडी बॅरिकेटस् लावण्यात आले आहे. गावात कुठूनही प्रवेश करता येवू नये, यासाठी अडथळे निर्माण करण्यात आले आहे. अनेक गावात ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या मार्गदर्शनात ग्राम सुरक्षा दलाचे तरूण अहोरात्र खडा पहारा देत आहे. ओळखीचा असो की अनोळखी त्याची कसून चौकशी केली जाते. महानगरातून आलेल्या विशेषत: रेड झोनमधून आलेल्या व्यक्तीची माहिती अंगणवाडी सेविकेमार्फत प्रशासनाला दिली जाते.मोहाडी तालुक्यातील हत्तीडोई, हरदोली यासाह लाखांदूर, लाखनी या तालुक्यातील गावांमध्ये असे चित्र आता दिसत आहे. अनेक ठिकाणी गावात प्रवेश बंद असे फलकही लावण्यात आले आहे. गावातील व्यक्तीलाही बाहेर सोडताना त्याची खात्री करूनच परवानगी दिली जाते. लॉकडाऊन घोषित होवून आता महिना झाला आहे. गाव सुरक्षित ठेवण्यासाठी गावकºयांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. गावातील तरूण आळीपाळीने खडा पहारा याठिकाणी देत आहे. एकंदरीतच ग्रामीण भागातही आता कोरोनाबाबत जनजागृती यशस्वीपणे झाली असून कोरोनाशी दोन हात करण्यासाठी ग्रामीण जनताही सरसावली आहे.नोंदवही आणि सॅनिटायझरगावबंदी असलेल्या गावाच्या प्रवेश द्वारावर नोंदवही ठेवण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्याची प्रत्येकाची नोंद केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला सॅनिटाईज करूनच आत सोडले जाते. हरदोली येथील सरपंच सदाशिव ढेंगे म्हणाले, गावात कोरोना संसशीत शिरू नये यासाठी स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आला. याला गावकरीही सहकार्य करतात.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस