शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

महारेशीम अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: March 24, 2017 00:34 IST

महाराष्ट्रात रेशीम उद्योगाचा विकास तळागाळातील, खेडयातील शेतकऱ्यांना माहिती व्हावा, या उद्देशाने महारेशीम अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रमय रथाचे आयोजन : पवनी, लाखांदूर तालुक्यात जनजागृतीभंडारा : महाराष्ट्रात रेशीम उद्योगाचा विकास तळागाळातील, खेडयातील शेतकऱ्यांना माहिती व्हावा, या उद्देशाने महारेशीम अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तुती रेशीम व टसर रेशीम सुरू असलेल्या गावांगावात सुरू करण्यात आले. भंडारा जिल्ह्यात रेशीम चित्रमय रथ तयार करण्यात आला असून त्या चित्ररथाला पवनी, लाखनी, साकोली, लाखांदूर तालुक्यातील २३ गावांमध्ये उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत गावात रेशीम तुती व टसर रेशीम उद्योगाबाबत माहिती ग्रामपंचायत, समाज मंदिरामध्ये सभा घेऊन माहिती देण्यात आली. सदर अभियान २५ मार्चपर्यंत कार्यरत राहणार आहे. भंडारा जिल्ह्यात तुती व रेशीम उद्योगासाठी लाखांदूर व पवनी तालुक्यातील चौरास पट्टयात गावांमध्ये मासळ, खैरी, घरतोडा, मोहरणा या गावातील ३० लाभार्थ्यांची ईच्छुक आहेत. आसगाव, मांगली, विरली खंदार, भेंडाळा येथील २० लाभार्थी असे ५० एकर क्षेत्रात तुती लागवडीसाठी नोंदणी होणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये जमीन तयार करण्यापासून, सरीवरंबा तयार करणे, तुती रोपे लागवड, आंतरमशागत, खते, औषध देणे तुती बागेस पाणी देणे, तुती छाटणी, गळ फांद्या काढणे या कामासाठी तीन वर्षे मिळून ६८२ मनुष्य दिवसांचे १,३०,९४४ रूपये आणि तुती रोपे किटक संगोपन आवश्यक साहित्य जसे चंद्रिका, ट्रे नॉयलॉन जाळी, जैवीक खते, पोषक औषधी, ब्रशकटर, स्प्रे पंप व निर्जंतुकी औषधासाठी तीन वर्षात मिळून ६१,७३० रूपये असे एकूण १,९२,६७४ रूपयांचे अनुदान एका लाभार्थ्यासाठी एक एकरासाठी आहे. रोजगार हमी योजनेमध्ये किटक संगोपनगृह बांधकामासाठी १००० वर्गफुटासाठी ८९,९४६ हजार रूपये ६०० वर्गफुटासाठी ५९,०६८ हजार तर २२५ वर्गफुटासाठी ३२,७४० रूपयांचे अनुदान देण्यात येते. जिल्ह्यातील लाभार्थींनी महारेशीम अभियानाचा लाभ घ्यावा व जास्तीतजास्त लोकांनी रेशीम उद्योगाकडे वळावे, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी सी. के. बडगुजर यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)उद्योगासाठी मिळणार जमीनटसर रेशीम उद्योगासाठी साकोली तालुक्यातील किटाळी समुहामध्ये बरडकिन्ही, मिरेगांव, गिरोला, चिचगांव, मुंडीपार या गावामध्ये शिबिर घेण्यात आले. यावेळी गिरोला येथे जिल्हा रेशिम अधिकारी सी.के. बडगुजर व सरंपच मनिषा नागलवाडे यांनी मागदर्शन केले. पवनी तालुक्यातील नांदीखेडा, कन्हाळगाव, चांदी, ढोरप, ठाणेगाव या गावांमध्ये रेशीम उद्योगाचे शिबिर घेण्यात आले. यावेळी चांदी येथील लाभार्थ्यांना वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक व्ही.पी. रायसिंग व वनरक्षक हटकर यांनी मार्गदर्शन केले. या दोन्ही तालुक्यात या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासाठी वनविभागाकडून सहकार्य मिळत आहे. निवड केलेल्या गावांमध्ये वनसमितीमार्फत ठराव घेऊन गावालगत उपलब्ध असलेले जंगल टसर रेशीम उद्योगासाठी लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल.