काश्मीर, सिमला, मनाली, अमृतसर, डलहौसी जाणार यात्रा : सदस्य आणि अन्य महिला व कुटुंबासाठी विशेष आयोजनभंडारा : लोकमत सखी मंचच्या ग्रीष्मकालीन यात्रेला (सहल) प्रत्येक वर्षी प्रचंड प्रतिसाद लाभतो. त्यामुळेच सखी मंचतर्फे सदस्य आणि इतर महिलांसाठी दरवर्षी थंड हवेच्या निसर्गरम्य ठिकाणी सहल आयोजित करण्यात येते. यंदाही काश्मीरची सहल २३ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. १० दिवसांच्या या सहलीत जम्मू, श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आदी स्थानांसहित श्रीनगरच्या शालिमार गार्डन, निशांत गार्डन, हजरतबल दर्गा, शंकराचार्य मंदिर, चारमिनार बाग, नेहरू पार्क या ठिकाणांचाही समावेश करण्यात आला आहे. सहलीत झिल हाऊसबोटचा आनंद घेण्याची संधीही पर्यटकांना लाभणार आहे. या सहलीत सहभागी होण्यासाठी प्रति व्यक्ती १६,९९९ रुपये शुल्क आकारण्यात येईल. इच्छुकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. २३ मे रोजीच सिमला, कुलू, मनाली यात्रा आयोजित करण्यात आली असून, १० दिवसांच्या या यात्रेचे शुल्कही प्रति व्यक्ती १६,९९९ रुपये ठेवण्यात आले आहे. यात अंबाला, मनाली, रोहतांग पास, सोलांग व्हॅली, वशिष्ठ मंदिर, हिडिंबा देवी मंदिर, कुलूची शॉल फॅक्टरी, वैष्णवमाता मंदिर, हिमालयीन झू, विंटर स्पोर्टस् कॅपिटल, चर्च, नुक्कड बजार, मॉल रोड शॉपिंग, चंदीगड, रॉक आणि पिंजर गार्डन आदी स्थळांचा समावेश आहे. ३० मे रोजी अमृतसर, डलहौसी आणि धर्मशाळेची यात्रा आयोजित करण्यात आली आहे. १० दिवसांच्या या यात्रेचे शुल्कही प्रति व्यक्ती १६,९९९ रुपये असून यात अमृतसर मंदिर, जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर, डलहौसी, चम्बा, खज्जीदार, धर्मशाळा, भगासू वॉटर फॉल, तिब्बती मॉनेस्ट्री आदी दर्शनीय ठिकाणांचा समावेश आहे. यात्रा शुल्कात येणे-जाणे, निवास, चहा-नाश्ता, दोनवेळ भोजन आणि फिरण्याची व्यवस्था आहे. माहितीसाठी नेहा जोशी यांच्याशी २४२९३५५, ९८५०३०४०३७, राजेश जोध यांच्याशी ९४२३६२८५०० या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
सखी मंचची विशेष यात्रा या महिन्यात
By admin | Updated: May 9, 2015 00:43 IST