शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

आपत्ती काळात शाळांना विशेष अनुदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:01 IST

प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला प्रत्येक बाबींची माहिती दिल्या जाते. खडा न खडा राज्याची परिस्थितीची जाणीव शासनाला असते. मग शाळा सुरू करण्याचा स्पष्ट निर्णय शासनानेच घ्यावा. शाळांवर जबाबदारी सोपवू नयेच असे निवेदनात नमूद आहे. कोरोना विषाणूची भीती अजूनही कायम आहे. कोरोना अजूनही आटोक्यात आलेला नाही.तरीही शाळा सुरू कशा सुरु करण्याची घाई होत आहे.

ठळक मुद्देगटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : भंडारा तालुका मुख्याध्यापक संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शाळा सुरु करा, त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आपत्ती काळात शासनाने विशेष निधी सर्व शाळांना उपलब्ध करून देण्यात यावा, यासह अन्य मागण्यांचे निवेदन भंडारा तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला प्रत्येक बाबींची माहिती दिल्या जाते. खडा न खडा राज्याची परिस्थितीची जाणीव शासनाला असते. मग शाळा सुरू करण्याचा स्पष्ट निर्णय शासनानेच घ्यावा. शाळांवर जबाबदारी सोपवू नयेच असे निवेदनात नमूद आहे. कोरोना विषाणूची भीती अजूनही कायम आहे. कोरोना अजूनही आटोक्यात आलेला नाही.तरीही शाळा सुरू कशा सुरु करण्याची घाई होत आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविला गेला आहे. शासन व प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा प्रभाव वाढत आहे तसेच पावसाळा सुरू झालेला आहे. ताप, सर्दी, खोकला याचे रुग्ण वाढत आहेत. तरीही शासनाने शाळा सुरू करा असा स्पष्ट निर्णय दिला पाहिजे. तसेच प्रशासनाने जबाबदार घटकांना स्वतंत्र पत्र पाठविले नाही. त्यामुळे शाळांनी पत्र स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग यांना दिल. मात्र संबंधीत प्रशासनाचे पत्रच आले नाही असे सांगितले जाते. मुलांना शाळेत येण्यासाठी कोणतीही सुविधा नाहीत.मानव विकास व अहिल्याबाई होळकर या योजनेतून एस. टी. बसने प्रवास बंद आहे. बस ने शाळेत येण्यास मनाई केली गेली आहे. अशा वेळी मुलींनी शाळेत पायपीट करित शाळेत यावे काय. शासनाने आधी शाळेत येण्यासाठी सर्व मुलांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मुख्याध्यापक संघाची आहे.शासनाने शाळा सुरू करण्याची जबाबदारी स्वत:वर घ्यावी. तसेच शाळांना कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यसाठी विशेष अनुदान देण्यात यावा. तसेच मुलांना शाळेत येण्यासाठी साधन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनात भंडारा तालुका मुख्याध्यापक संघाने शासन, प्रशासनाकडे केली आहे.यावेळी भंडारा तालुका संघाचे अनमोल देशपांडे, प्रदीप मुटकुरे, सुनिल घोल्लर, एच. पी. लांजेवार, संजीव कुकडे, रामकृष्ण शेंडे, राधेश्याम धोटे यांनी गटशिक्षणाधिकारी एच. दहिवले, शंकर राठोड यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.कोरोनाची भीती अजूनही कायम आहे. कोरोना अजूनही आटोक्यात आलेला नाही.तरीही शाळा सुरू कशा सुरु करण्याची घाई होत आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविला गेला आहे. शासन व प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या