शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदी कुथे, उईके, बोरकर, कटकवार यांची वर्णी

By admin | Updated: February 15, 2017 00:21 IST

नगरपरिषद भंडाराच्या सहा सभापतीपदांच्या पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली.

भंडारा नगरपालिकेत निवडणूक : सभापतीचे एक पद काँग्रेसला, स्थायी समितीत राकाँला सदस्यपद भंडारा : नगरपरिषद भंडाराच्या सहा सभापतीपदांच्या पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात शिक्षण समिती सभापतीपदी काँग्रेसच्या जयश्री रविंद्र बोरकर, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी वनिता दिलीप कुथे, नियोजन व विकास समिती सभापतीपदी भूमेश्वरी मनोज बोरकर, महिला व बालकल्याण समिती सभापती आशा हरिश्चंद्र उईके व स्वच्छता वैद्यक व आरोग्य समिती सभापतीपदी ब्रिजमोहन फत्तूलाल कटकवार यांची निवड करण्यात आली.नगरपरिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) विजया बनकर, नगराध्यक्ष सुनिल मेंढे व मुख्याधिकारी अनिल अढागळे यांच्या उपस्थितीत सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विशेष म्हणजे ही निवड प्रक्रिया ४ वाजता पार पाडली असली तरी सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार हे आधीच निश्चित झाले होते. भंडारा नगरपालिकेच्या एकुण ३३ नगरसेवकांपैकी भाजपचे १५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ११, काँग्रेसचे ३ तर अपक्ष ४ सदस्य आहेत. यापैकी काँग्रेस व अपक्ष सदस्यांनी भाजपला पाठींबा दिला आहे. ७ फेब्रुवारीला अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सात दिवसांनी सभापतीपदाची निवड करण्यात आली. सभापती पदावर निवड झालेल्या वनिता कुथे, भूमेश्वरी बोरकर, आशा उईके, ब्रिजमोहन कटकवार हे सदस्य भाजपच्या शिक्षण समिती सभापतीपदी वर्णी लागलेल्या जयश्री बोरकर या काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी नियमाप्रमाणे उपाध्यक्ष कवलजितसिंह चढ्ढा यांची निवड करण्यात आली. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदाकरिता गीता सुरेश सिडाम यांची निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)स्थायी समितीही गठितसभापतीपदाच्या निवडीनंतर स्थायी समितीही गठीत करण्यात आली. स्थायी समितीचे सभापतीपद हे पदसिद्ध आहे. त्यामुळे याचे सभापतीपद सुनिल मेंढे यांना मिळाले. सदस्यपदी जयश्री बोरकर, वनिता कुथे, भूमेश्वरी बोरकर, आशा उईके, ब्रिजमोहन कटकवार, दिनेश भुरे, साधना त्रिवेदी तर राकाँचे अ‍ॅड.विनयमोहन पशिने यांची निवड करण्यात आली. भंडारा शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सभापती तसेच नगरसेवकांच्या सहकार्याने भंडाऱ्यातील विकासकामे हाच आमचा मुख्य अजेंडा आहे.-सुनिल मेंढे,नगराध्यक्ष, भंडारा.