शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

प्रदूषणामुळे चिमण्यांना धोका

By admin | Updated: May 5, 2016 00:58 IST

धुळीपासून चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकाच्या प्रदूषणामुळे पशुपक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे.

भंडारा : धुळीपासून चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकाच्या प्रदूषणामुळे पशुपक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे.पूर्वी पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत सतत चालणारा चिमण्यांचा चिवचिवाट कायमचा बंद झाला. शहरातील सिमेंटच्या जंगलामुळे पक्ष्यांचे निवारेसुध्दा लोप पावले. परंतु चिमण्यापाखरांसोबत नातीगोती जपणाऱ्यांनी मात्र चिमण्यांचा सहवास मिळावा म्हणून पक्षीप्रेमी नागरिक घरांच्या गच्चीवर कृत्रिम घरटे लावण्याचा उपक्रम राबवतात. पशुपक्षी घरट्यातून बाहेर येत एकच कलह होत होता. तेव्हा पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे महिला मंडळी पहाटे सडा सारवण करीत होत्या. परंतु आता सूर्यवशंचा जमाना आला. कुणालाही सडा सारवण करण्याची गरज वाटत नाही. जुन्या काळची भूपाळीसुध्दा काळाच्या पडद्याआड गेली आहे. विज्ञानाने सर्वच क्षेत्रात प्रगती करून मानवाला ऐहिक सुखाच्या विळख्यात टाकले आहे. परंतु तेवढेच दुष्परिणामसुध्दा वाढले आहेत. मानवी जीवन आजाराने वेढले गेले. विकासाची प्रगती मानवी जीवनाला अडसर ठरत आहे. यामुळे मानवाला अनेक आजारांनी ग्रासले आहे. निसर्गातील पशुपक्षीसुध्दा काळाच्या पडद्याआड जात आहे. जंगलात पिकावर होत असलेल्या अतिविषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे पक्ष्यांचे खाद्य अळ्यासुध्दा नाहिशा झाल्याने पशुपक्ष्यावर उपासमारी येऊ लागली आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या चिमण्या तर केवळ बोटावर मोजण्याइतक्या दिसून येतात. 'कावळ्यांचे घर शेणाचे आणि चिमणीचे घर मेणाचे' ही म्हणसुध्दा कालबाह्य झाली आहे. शहरी भागात सिमेंट रस्ते आणि मोठमोठ्या इमारतीमुळे शहरातील चिमण्यांचा चिवचिवाट नाहिसा झाला. पहाट कधी होते हे कळायला मार्ग नाही. कालांतराने येणाऱ्या पिढीला केवळ पुस्तकात चिमण्यांचे चित्र पाहून समाधान मानावे लागेल. पर्यावरणवाद्यांनी यावर चिंतन करण्याची वेळ आली तर शासनाने याकरिता विशेष कायदा करणे गरजेचे झाले. भ्रमणध्वनीसुध्दा याला कारणीभूत ठरत असल्याचे पर्यावरणवाद्यांचे मत आहे. शहरातून तर चिमण्यांचा चिवचिवाट कायमचा बंद झाल्याने निसर्गवाद्यांना सतत चिंता भेडसावू लागली आहे. याकरिता काही पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी घराच्या आजूबाजूला कृत्रिम घरटे आणि पाण्याची व्यवस्था करून चिमण्या पाखरांना निवारा देण्याचा प्रयत्न करीत असतात. चिमण्या-पाखरांवर परमाणू लहरीचा परिणाम होऊन चिमण्यांनी आता आपला मोर्चा निसर्गाच्या सान्निध्यात वळविला असल्याने शहरात चिमण्या नामशेष झाल्या आहे. ( नगर प्रतिनिधी)