ठळक मुद्देएक लाखाचे नुकसान : वीज वितरणने भरपाई देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शेतातून गेलेल्या वीज तारांमध्ये घर्षण होवून पडलेल्या ठिणग्यांमुळे शेतातील उभा ऊस भस्मसात झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील खैरी येथे घडली. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.खैरी येथे योगेश सहादेव ईश्वरकर यांचे शेत आहे. या शेतातून वीज तारा गेल्या आहेत. या तारा लोंबकळलेल्या असून थोडीतरी हवा आली तरी त्यामध्ये घर्षण होते. त्यातून ठिणग्या पडतात.दोन दिवसांपुर्वी विद्युत तारांचे घर्षण होवून ठिणगी पडली आणि त्यांच्या शेतातील संपूर्ण ऊस जळाला. हा प्रकार दिसताच परिसरातील शेतकºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र ऊस जळून खाक झाला. यात शेतकरी योगेश ईश्वरकर यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई करण्याची मागणी होत आहे.