शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

९० हजार हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2016 00:14 IST

यावर्षी आजपर्यत ८५ टक्के पाऊस पडल्याची नोंद शासन दरबारी असली तरी भंडारा जिल्ह्यातील ९० हजार ६०४ हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली आहे.

निसर्गाची अवकृपा : खरीपाची पेरणी ५७ टक्के, पावसाची टक्केवारीही घसरलीदेवानंद नंदेश्वर भंडारायावर्षी आजपर्यत ८५ टक्के पाऊस पडल्याची नोंद शासन दरबारी असली तरी भंडारा जिल्ह्यातील ९० हजार ६०४ हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरीप हंगामासाठी सध्यस्थितीत १ लाख १८ हजार ९२३ हेक्टर क्षेत्रात पिकाची पेरणी करण्यात आली आहे़ जिल्ह्यात दोन लाख नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत असून, आतापर्यंत ५६.७६ टक्के हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे.भंडारा जिल्ह्यात १८ हजार २७६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १७ हजार ९१.४२ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ९३.९२ एवढी आहे. यामध्ये भंडारा तालुक्यात २,६४२ हेक्टर, पवनी २,४९२ हेक्टर, मोहाडी २,८९५ हेक्टर, तुमसर २,९४०, साकोली १,६९४, लाखांदूर २,४०८ तर लाखनी तालुक्यात २,०२०हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी ८ हजार २८४ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड केली. यामध्ये सर्वाधिक लागवड लाखांदूर तालुक्यात असून २,००८ हेक्टर आहे. भंडारा ३८ हेक्टर, पवनी १,७७५, मोहाडी ५०, तुमसर ९०, साकोली १,५५१ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड करण्यात आली. यासह जिल्ह्यात तुर १,०४२.५० हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. त्याची टक्केवारी ११०.९२ आहे. यासह मुंग ३.५० हेक्टर, तीळ १८१.२०, सोयाबिन १,००५, हळद ३७६, कापूस ६९०.२०, तर भाजिपाल्याची ९४५ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली़रोवणी केवळ ५२ टक्के, पेरणीही अपुरीजिल्ह्यात एक लाख ८२ हजार ७६२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी केवळ ९६ हजार ३०४.२८ हेक्टर क्षेत्रात रोवणी लागवड केलेली आहे. यात भंडारा तालुक्यात १२ हजार ९२ हेक्टर, मोहाडी ९,४०९, तुमसर १४,४७७, पवनी १९,१९४, साकोली १३,१२०, लाखनी १०,७४५, लाखांदूर १७,२६७ हेक्टरचा समावेश आहे. रोवणी करणाऱ्या मजुरांची मजुरी कडाडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ बियाने खते किटकनाशकांच्या दरात वाढ झाली आहे़ सरासरी पाऊस कमीयावर्षीच्या पावसाळ्यात १ जून ते ६ आॅगस्टपर्यंत ६१३.३ मि.मी. पाऊस बरसला. प्रत्येक्षात या कालावधीत सरासरी ७१८.६ मि.मी. पाऊस पाहिजे होता. मागीलवर्षी याच कालावधीत ५८८ मि.मी. सरासरी पाऊस बरसला होता. ६ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात ३३.७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. यात भंडारा ३३.४ मि.मी., मोहाडी ६४, तुमसर ४५.४, पवनी ३.६, साकोली ४८.४, लाखांदूर १५.२ तर लाखनी तालुक्यात २६.२ मि.मी. पावसाचा समावेश आहे.कमी अधिक पावसामुळे रोवणी खोळंबलीभंडारा जिल्ह्यात ८५ टक्के पाऊस कोसळल्याची नोंद शासन दरबारी असली तरी अनेक ठिकाणी पाऊस कमी अधिक बरसला आहे. परिणामी धानपिकाला रोवणीसाठी उपयुक्त पाणी झाले नाही. मोटरपंप तसेच इंजिनच्या माध्यमातून पाणी विकत घेवून रोवणी आटोपण्यासाठी शेतकरी आटापिटा करीत आहे. वरथेंबी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचे पऱ्हे रिमझिम पावसामुळे जगत असले तरी रोवणीसाठी मात्र त्यांच्याकडे मुबलक पाणी साठा नाही. मराठवाडा, कोकण, मुंबई या ठिकाणी दमदार पावसाची हजेरी आहे. पावसामुळे नासधुस होत आहे. मुंबई येथे पाऊस आल्यानंतर विदर्भात त्याची हजेरी लागत असते, असा समज शेतकऱ्यांचा आहे. मात्र मुंबईला जोरदार पाऊस होत असला तरी अद्यापही भंडारा जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पावसाने अजुनही हजेरी लावलेली नाही. त्यामुळे खरीपाची पेरणी अद्यापही रखडली आहे. १५ आॅगस्टपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली नाही तर भंडारा जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.