शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

साकोली तालुक्यात २० हजार हेक्टरमध्ये पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:45 IST

तालुक्यात खरीप हंगामाला जोमात प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीची कामे पुर्णत्वाकडे आहे. सध्या दमदार पावसामुळे चिखलणीच्या कामाला वेग आला आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या ३७ टक्के कमीच पाऊस पडला आहे.

ठळक मुद्देचिखलणीच्या कामाला प्रारंभ : पाऊस सरासरीपेक्षा कमीच

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात खरीप हंगामाला जोमात प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीची कामे पुर्णत्वाकडे आहे. सध्या दमदार पावसामुळे चिखलणीच्या कामाला वेग आला आहे.यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या ३७ टक्के कमीच पाऊस पडला आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईची स्थिती कायम आहे. तर तालुक्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात बरसलेल्या पावसाच्या सरीनंतर खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध होती, अश्या शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली होती. मात्र पºहे चार इंचीचे झाल्यावरही या शेतकºयांना पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा होती. अखेर आद्रा नक्षत्राच्या सहाव्या दिवशी पाऊस बरसताच चिखलणीची कामाला सुरुवात होऊन अन्य शेतकºयांनी पेरणीची कामे हातात घेतली. गत चार ते पाच दिवसात पाऊस आल्याने शेतकरी ही खरीप हंगामात व्यस्त दिसून येत आहे. साकोली तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त भागात धानाची लागवड केली जाते. चिखलणीची कामे झाल्यानंतर बळीराजा खत फवारणीच्या कामाला लागणार आहे.यंदा मान्सून केरळ किनारपट्टीवर उशिराने दाखल झाला आहे. तसेच मान्सून सुरू व्हायच्या वेळेस भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर 'वायू चक्रीवादळ' आले होते. त्यामुळे मान्सुन दक्षिण कर्नाटकमध्येच जास्त दिवस बरसला आहे. या सर्व कारणांमुळे जून महिन्यात कमी पाऊस पडला आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात १ जून ते ४ जुलै या कालावधीत सर्व तालुक्यांमध्ये सरासरी २३१.७ मिलिमीटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र, तुलनेने उशिरा सुरू झालेला पाऊस केवळ २०१.५ मिलिमीटर पडला आहे. या अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपातील पेरण्याची लगबग सुरू केल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यातील पेरणीचे काम अंतिम टप्यात आहे.चौरास भागात भात पीक रोवणीला प्रारंभआसगाव चौ. : ज्याच्याकडे ओलीताची सोय आहे. विहिरीला पाणी आहे. त्या शेतकऱ्यांनी रोहणी नक्षत्रातच भात पिकांच्या पऱ्हे नर्सरी तयार करुन भरली. त्यांनी पंपाच्या सहाय्याने सिंचन करुन मेहनतीने पऱ्हे जगविले. त्यांच्या पऱ्हे नर्सरी रोवण्या योग्य झाल्यामुळे व आद्रा नक्षत्राचा पाऊस समाधानकारक झाल्यामुळे चौरास परिसरातील १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. मात्र कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना रोवणीसाठी २० ते २५ दिवासचा कालावधी लागणार आहे. कारण पावसाची सुरुवात उशीरा सुरु झाल्यामुळे पऱ्हे तयार होण्यासाठी बराच अवधी लागणार आहे व पावसाची सुध्दा प्रतीक्षा करावी लागेल.

टॅग्स :agricultureशेती