शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला प्रकल्पातील निविदा कंत्राटदाराला काळ्या यादीत घालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 05:00 IST

ऐन पाणी उपसा करण्याचे हंगामात पंप बंद ठेवण्यात येत आहेत. ६ पंप नादुरुस्त असताना गत तीन वर्षांपासून नागपुरातून परत आणले जात नाहीत. पंप दुरुस्ती, देखभाल आणि पंपगृहांचे कंत्राट प्रकाश मेश्राम यांना देण्यात आले आहेत. कंत्राटदार नागपूरहून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प आणि गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पावर नियंत्रण ठेवत आहेत. एकाच कंत्राटदाराला दोन्ही प्रकल्पाचे कंत्राट दिले जात आहेत.  

रंजित चिंचखेडेलाेकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातील पंपगृहांचे बाबतीत सातत्याने दुर्लक्ष करीत असणाऱ्या निविदा कंत्राटदार प्रकाश मेश्राम यांना काळ्या यादीत घालण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या विरोधात वारंवार वाढत्या तक्रारी असल्याने जलसंपदा विभागाकडे  माहिती देण्यात आली आहे. यामुळे कंत्राटचे बचाव करण्यासाठी मेश्राम हे मंत्रालयात घिरटे घालत असल्याचे सांगण्यात येत आहे. पुन्हा या कंत्राटदाराला पंपगृहांचे कंत्राट मिळणार नाही. याकरिता पाटबंधारे विभागाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती नाव न प्रकाशित करण्याचे अटीवर एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. ऐन पाणी उपसा करण्याचे हंगामात पंप बंद ठेवण्यात येत आहेत. ६ पंप नादुरुस्त असताना गत तीन वर्षांपासून नागपुरातून परत आणले जात नाहीत. पंप दुरुस्ती, देखभाल आणि पंपगृहांचे कंत्राट प्रकाश मेश्राम यांना देण्यात आले आहेत. कंत्राटदार नागपूरहून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प आणि गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पावर नियंत्रण ठेवत आहेत. एकाच कंत्राटदाराला दोन्ही प्रकल्पाचे कंत्राट दिले जात आहेत.  प्रकल्प स्थळात ९ पैकी फक्त ३ पंप उपलब्ध असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसून आले आहे. पंप आणि प्रकल्पाची अवस्था पाहून अधिकारी संतापले आहेत. अस्थाई कामगारांचे तीन वर्षांपासून नियमित वेतन देण्यात येत नसल्याने वारंवार पंप बंद करण्यात येत आहेत. अस्थाई कामगार संप पुकारत आहेत. अस्थाई कामगारांना वेतन देण्याची जबाबदारी निविदा कंत्राटदाराची आहे. कंत्राटदार कामगारांना गाजर दाखवित आहे. लोकमतने आज रविवारी वेतनाअभावी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पातून उपसा बंद या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. शाखा अभियंता लाड व अन्य वरिष्ठ अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. नागपूरहून सकाळीच निविदा कंत्राटदार प्रकल्प स्थळात पोहोचले आहे. पाठबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला खडसावले आहे. पंप दुरुस्त करीत नसल्याचे चौकशीत निदर्शनास आले आहे.

काळ्या यादीत घालणार- प्रकल्पातील पंप व पंपगृहांचे कामाचे कंत्राट निविदा कंत्राटदार प्रकाश मेश्राम यांना पुन्हा व कधीही देण्यात येणार नाही. याकरिता काळ्या यादीत घालण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. पुन्हा कंत्राट प्राप्त करण्यासाठी कंत्राटदाराने मंत्रालयात घिरट्या सुरू केलेल्या आहेत. नवीन कंत्राटदाराला कंत्राट देण्यात यावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प