शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला प्रकल्पाचा मुद्दा चिघळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 01:18 IST

तुमसर तालुक्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सोंड्याटोला उपसा सिंचन योजना बंद आहे. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही.

आंदोलन ३० रोजी : शिवसेनेने दिला अल्टीमेटम भंडारा : तुमसर तालुक्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सोंड्याटोला उपसा सिंचन योजना बंद आहे. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. विद्युत देयकाचा भरणा न केल्याने राजकीय पक्षांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला ऐरणीवर आणले आहे. यासंबंधी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी ३० जुलै रोजी सिहोरा येथे आंदोलाचा इशारा दिला आहे. वारंवार सांगूनही प्रशासनीक अधिकारी शेतकऱ्यांच्या मुद्याकडे लक्ष देत नाही. विज देयक भरून बुधवारपर्यंत प्रकल्प सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले असले तरी शिवसेनेने २९ पर्यंत प्रशासनाला अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान आंदोलनापुर्वी सोंड्याटोला उपसा सिंचन योजना सुरू झाला पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती आहे. धानाला भाव नाही, प्रत्येक एकरी पाच ते दहा पोते धानाचे उत्पादन होत आहे. शासन आणेवारीच्या भरोशावर शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची वसूली केली जाते. मात्र शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जात नाही. धानाला भाव तीन हजार रूपये देण्यात यावा ही फार जुनी मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मोफत विद्युत पुरवठा, नि:शुल्क खतपुरवठा, किटकनाशके तसेच मनरेगा अंतर्गत मजुर उपलब्ध करून द्यावे, या प्रश्नावरही शासन गप्प आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे विद्युत बिल भरून योजना कार्यान्वीत करण्यात यावी अथवा प्रशासनाने आंदोलनाला समोरे जावे, असा इशारा राजेंद्र पटले यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)