शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सोमलवाडा-किन्ही रस्ता ठरतोय शेतकऱ्यांचा कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2022 05:00 IST

पंधरा वर्षांपूर्वी सदर रस्ता डांबरीकरणासाठी एका ठेकेदाराने साहित्य टाकले. तसेच डांबरीकरण न करताच साहित्य उचलून नेले. मात्र डांबरीकरण झाल्याची व सदर कामाची रक्कम दिल्याची नोंद बांधकाम विभागाकडे आहे. तसेच दहा वर्षांपूर्वी डागडुजी (पॅच वर्क) झाल्याचीही नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात एकही काम झाले नाही व मुदतीत बसत नसल्याने त्याचे काम पुन्हा करता येत नाही, असे सांगितले जाते.

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखनी : नजीकच्या सोमलवाडा - किन्ही गावाला जोडणारा २ किमी अंतराचा रस्ता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरलेला आहे. सोमलवाडा येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन किन्ही व सोनेखारीच्या भौगोलिक क्षेत्रात येते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना रोज बैलगाडी व ट्रॅक्टरने रहदारी करावी लागत आहे.पंधरा वर्षांपूर्वी सदर रस्ता डांबरीकरणासाठी एका ठेकेदाराने साहित्य टाकले. तसेच डांबरीकरण न करताच साहित्य उचलून नेले. मात्र डांबरीकरण झाल्याची व सदर कामाची रक्कम दिल्याची नोंद बांधकाम विभागाकडे आहे. तसेच दहा वर्षांपूर्वी डागडुजी (पॅच वर्क) झाल्याचीही नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात एकही काम झाले नाही व मुदतीत बसत नसल्याने त्याचे काम पुन्हा करता येत नाही, असे सांगितले जाते. सात वर्षांपूर्वी किन्नी येथील वंदना पंधरे या  जि.प. सदस्या झाल्या. त्यांनी जिल्हा परिषदेतून सदर रोडचे काम मंजूर करवून घेतले. परंतु अडीच वर्षांनी जिल्हा परिषदेची सत्ताबदल झाल्याने सदर काम रद्द झाले, असे सांगण्यात येते. राजकारणाच्या कचाट्यात शेतकरी मात्र यातना भोगत आहे. या मार्गावर दोन नाल्यावर पूल आहेत. एका पुलाची स्थिती गंभीर आहे. पावसाळ्यात केव्हाही तुटून वाहून जाऊ शकतो.  जीवित हानीही होऊ शकते. पावसाळ्यात पायी सुद्धा चालता येत नाही. खडीवाहून गेल्यामुळे चिकन मातीवरून ट्रॅक्टर व बैलसुद्धा घसरतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशीच अवस्था सोमलवाडा-सोनेखारी रस्त्याची आहे. याकडे नवनियुक्त  लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी सुरेश टिचकुले व शेतकऱ्यांनी केली आहे.

ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था- जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यांना बिकट अवस्था प्राप्त होत असते. चिखलामुळे अनेक अपघातही घडले आहेत. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग