भंडारा : प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील पदवीधर शिक्षकांच्या मागण्या रास्त असून त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथ.) स्वर्णलता घोडेस्वार यांनी दिले. महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघ जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. पदविधर शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिक्षणाधिकारी घोडेस्वार यांची भेट घेत निवेदन सादर केले. निधी उपलब्ध करताच तसेच यापुढे नियमितपणे शिक्षकांचे वेतन अदा केले जाईल, केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांची पदे भरण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून २५ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेतला जाईल. समितीच्या अहवालानुसार वेतन प्रकरणे निकाली काढली जातील. माध्यमिक विभागातील इयत्ता सहावी ते आठवीमधील पदवीधर शिक्षकांची पदे सुधारित कायद्यानुसार भरली जातील पदवीधर शिक्षक केंद्र प्रमुख उच्च श्रेणी मुख्याध्यापक सहाय्यक शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाईल असेही शिक्षणाधिकारी सुवर्णलता घोडेस्वार यांनी सांगितले. याप्रसंगी राज्य प्रतिनिधी प्रमोद ढमे, सरचिटणीस मुकुंद ठवकर, व्ही.टी. बन्सोड, जयंत उपाध्ये, वसंत साठवणे, भारत मेश्राम, एच.पी. लांजेवार, अंकुश हलमारे, गणेश शेंडे, एन.एम.धकाते, डी.एन. शेंडे, के.जे. रंगारी, टी.आर .दोनोडे, सोमेश्वर गिऱ्हेपुंजे, बाळासाहेब मुंडे, ज्ञानचंद जांभुळकर, साखरवाडे, निमकर, अनिल दहिवले, बी.आर. गिऱ्हेपुंजे, आर.कोसरे, मनोहर कारेमोरे, पी.ए. करंजेकर, डेव्हीड गजजिभये, शैलेश शाहू, अरुण कावळे, विनायक मोथारकर, माया बोटकवार, साधना कटरे, आर.आर. कोसरे, जे.जे. साठवणे, व्ही.व्ही. भोले, साधना डोंगरे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
पदवीधर शिक्षकांच्या समस्या सोडविणार
By admin | Updated: November 17, 2014 22:48 IST