शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

समाधान शिबिर विकासाचे माध्यम

By admin | Updated: January 30, 2016 00:59 IST

शासनाच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचाव्यात, त्यातून सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने शासनाच्या महसूल विभागांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन केले जात आहे ...

धनादेश वितरण : विजयकुमार उरकुडे यांचे प्रतिपादनकरडी (पालोरा) : .शासनाच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचाव्यात, त्यातून सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने शासनाच्या महसूल विभागांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन केले जात आहे त्यातून जनतेच्या समस्यांचे निराकरण होवून विकासाला नवी चालना मिळत आहेत. नागरिकांनी या शिबिरांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विजयकुमार उरकुडे यांनी देव्हाडा येथे संपन्न झालेल्या शिबिरात व्यक्त केले.राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत राजस्व अभियानातून समाधान शिबिराचे आयोजन देव्हाडी बुज येथील साईबाबा मंदिराचे आवारात करण्यात आले. त्यावेळी उपजिल्हाधिकारी उरकुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य महादेव पचघरे यांनी केले. यावेळी सरपंच विणा पुराम, उपसरपंच महादेव फुसे, माजी जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, डॉ. अडकने, सरपंच किशोर माटे, दिनदयाल बोंदरे, यशवंत आसटकर, यमु बोंदरे, सुजिता वासनिक, अरुण शेंडे, रेखा धुर्वे, मंदा लाळे, दुर्याेधन बोंदरे, तहसिलदार पोहनकर, नायब तहसिलदार थोटे, उपजिल्हाधिकारी शहारे आदी उपस्थित होते.पचघरे यावेळी म्हणाले, समाधान शिबिराचे आयोजन गावागावात झाले पाहिजे. त्या प्रमाणात शिबिराचे आयोजन होत नाही. ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केला. जनतेच्या समस्याचे समाधान करताना कुठलाही भेदभाव करण्यात येवू नये. तालुक्यात गरजू लोकांना क्षावणबाळ, संजय गांधी योजना आदींच्या लाभासाठी पिळवणूक होत आहे.आभार मंडळ अधिकारी पठान यांनी मानले. शिबिराला तालुका कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, विद्युत विभाग, बालविकास प्रकल्प विभाग, महसूल विभागाने स्टॉल लावून लोकांना समाधान शिबिराचे महत्व पटवून सांगितले. अतिथींच्या हस्ते अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले. राशन कार्डाचे वाटप व फेरफार निकाली काढण्यात आले. शिबिरासाठी तलाठी बिरनवार, मौदेकर, कांबळे, घोडेस्वार, कोतवाल अनिल वैद्य, अशोक डोंगरे, भारत रोडगे, मेघराज वासनिक यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)