शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मोहाडी तालुक्यातील रेतीघाटांवर तस्करांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

मोहाडी तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. या नदीतील रेतीला सर्वत्र मोठी मागणी आहे. त्यामुळेच रेती तस्करांनी गत काही वर्षांपासून आपला मोर्चा रेतीघाटांवर वळविला आहे. तालुक्यातील घाटांवर पहाटेपासून उशिरा रात्रीपर्यंत जेसीबीच्याद्वारे रेतीचे उत्खनन केले जाते.

ठळक मुद्देअद्याप लिलावच झाले नाही : सुकळी, ब्राम्हणी, चारगाव, ढोरवाडा घाटावर धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : वैनगंगेच्या रेतीला विदर्भात मोठी मागणी असल्याने मोहाडी तालुक्यातील रेती घाटावर तस्करांचा धुमाकूळ सुरु आहे. लिलाव झाले नसतानाही सुकळी, ब्राम्हणी, चारगाव, ढोरवाडा घाटावर रेतीचे खुलेआम उत्खनन होत आहे. या सर्व प्रकाराकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.मोहाडी तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. या नदीतील रेतीला सर्वत्र मोठी मागणी आहे. त्यामुळेच रेती तस्करांनी गत काही वर्षांपासून आपला मोर्चा रेतीघाटांवर वळविला आहे. तालुक्यातील घाटांवर पहाटेपासून उशिरा रात्रीपर्यंत जेसीबीच्याद्वारे रेतीचे उत्खनन केले जाते. विना क्रमांकाच्या ट्रक आणि ट्रॅक्टरद्वारे ही रेती भंडारा मार्गे नागपूर, पारडी, रामटेक, मौदा येथे विकली जाते. वैनगंगेच्या सुकळी, ब्राम्हणी, चारगाव, ढोरवाडा, रोहा, बेटाळा घाटावर सध्या मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु आहे. नदीच्या तिरावरच रेतीचे साठे तयार केले जात आहे. येथून वाहनाद्वारे वाहतूक केली जाते. मोठ्या शहरामध्ये त्याची विक्री होत आहे.सध्या एकाही घाटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे शासनाला कोणतीही रक्कम न भरता रेतीची तस्करी केली जात आहे. मात्र या सर्व प्रकारात महसूल विभाग आपले उखळ पांढरे करुन घेत आहे. तलाठी मंडळ अधिकारी यांना हाताशी धरुन रेतीचा सपाटा लावला आहे. गत महिन्याभरापासून रेती तस्करांचा धुळगूस सुरु असून यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. उलट घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रेती मात्र मिळत नाही.रेती माफीयांनी अनेक गुंड प्रवृत्तीचा तरुणांना हाताशी धरले आहे. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केला तरी ते कुणाला जुमानत नाही. सदर तरुण पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करुन असतात.रेती घाटांकडे कुणी येत असल्यास त्याची माहिती तात्काळ मोबाईलवरुन संबंधित वाहनचालकांना दिली जाते. यामुळे एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याने कारवाईचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होत नाही.कर्मचाऱ्यांची वाहने तस्करीततुमसर-मोहाडी तालुक्यात रेती व्यवसाय सोन्याची अंडे देणारी कोंबडी ठरली आहे. त्यामुळे अनेकजण या व्यवसायात उतरले आहे. महसूल व पोलिसातील अनेक कर्मचाºयांनी वाहने घेऊन या व्यवसायात उतरविल्याची माहिती आहे. वाहनाच्या मुळ मालकांचा शोध घेतल्यास अनेक धक्कादायक प्रकार बाहेर येण्याची शक्यता आहे. यात कर्मचारीच गुंतल्याने वरिष्ठ कारवाई करण्यास मागेपुढे पाहतात.